चित्रपट, मलिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना युवा वर्ग डोळ्यासमोर ठेवून, आपला आदर्श मानून त्यांच्यासारखं उत्तम कलाकार बनू पाहत असतो. अभिनयामध्ये करियर बनवू पाहणाऱ्या अनेकांना आपण पाहिलंय की कोणी ना कोणी कलाकार त्यांचा आदर्श असतो आणि त्यांना समोर ठेवून ते भविष्यात पुढे जातं असतात. बरेचसे लोक हे त्यांचे फॅन असतात. त्यांच्यासोबत फोटो काढणं, त्यांना भेटणं ही खूप मोठी गोष्ट असते. पाहूया असेच काही मुलं जी त्यांचा लहानपणी विख्यात कलाकारांसोबत फोटो काढत होते पण आता स्वतःदेखील मोठे कलाकार म्हणून उदयास आले आहेत.

५. विक्की कौशल – हिंदी चित्रपटसृष्टीचा क्रिश असलेल्या ह्रितिक रोशन सोबत फोटो काढणारा लहान मुलगा विक्की कौशल होता. संजू, राझी, मनमर्जिया या चित्रपटांमधून आपण विक्की कौशलला पाहिले आहे. उरी: द सर्जिकल स्ट्राइक हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता म्हणून विक्कीने काम केले होते. आजच्या घडीला विक्की हा खूप मोठा कलाकार म्हणून उदयास आला आहे. भूत पार्ट वन आणि सरदार उधम सिंह हे विक्की कुशलचे आगामी चित्रपट आहेत.
४. सई मांजरेकर – दबंग 3 या चित्रपटातून लोकांसमोर आलेली नवोदित अभिनेत्री सई मांजरेकरला खूप लोकप्रियता या चित्रपटाद्वारे मिळाली. लहानपणी सलमान खान सोबत फोटो काढणारी सई आता सलमानच्या चित्रपटामध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळाली. प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता महेश मांजरेकर यांची सई ही कन्या आहे.
३. रणवीर सिंह – हिंदी सृष्टीतील सध्याचा यशस्वी कलाकार व सर्वात जास्त मानधन स्वीकारणारा रणवीर सिंग. हल्ली बॉक्सऑफिसवर ज्याचा प्रत्येक चित्रपट हिट ठरतो अशा या रणवीर सिंग ने लहानपणी अक्षय कुमार सोबत फोटो काढलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता येणाऱ्या सूर्यवंशी या चित्रपटात हे दोन्ही कलाकार एकत्र दिसण्याची शक्यता आहे. सिंघम आणि सिम्बानंतर सूर्यवंशी या चित्रपटामध्ये अक्षय कुमार पोलिसाच्या भूमिकेत असेल तर सोबत रणवीर आणि अजय देवगण असण्याची शक्यता आहे. 83 या कपिल देव आणि 1983 च्या वर्ल्डकपची गोष्ट असलेल्या चित्रपटामध्ये कपिल देवच्या भूमिकेत रणवीर दिसेल.
२. यश – के जी एफ मधून लोकप्रिय झालेला अभिनेता यश हा कन्नड चित्रपटातील यशस्वी कलाकार म्हणून ओळखला जातो. नवीन कुमार गौडा हे यशचे खरे नाव आहे. यशने लहानपणी सैफ अली खानसोबत फोटो काढला होता. मि आणि मिसेस रामाचारी, राजधानी, के जी एफ चॅप्टर 1 या चित्रपटांमधून तो लोकप्रिय झाला. केजीएफ चैप्टर 2 या आगामी चित्रपटात यश पाहायला मिळेल.
१. अक्षय कुमार – हिंदी चित्रपटसृष्टीचा खिलाडी असलेला अक्षय कुमारदेखील यात सामील आहे. बॉलीवूड मधील यशस्वी कलाकार, सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून अक्षय कुमारची ख्याती आहे. अक्षयने लहानपणी अभिनेते दारा सिंह यांच्यासोबत फोटो काढला होता. आज अक्षय हा अतिशय उत्तम कलाकार ठरला आहे. सूर्यवंशी या सिनेमात अक्षय आपल्याला पहायला मिळेल. 1700 करोड रुपयांची मालकी अक्षयकुमारची आहे.