जेव्हा आपण पडद्यावर सुंदर नाजूक गोऱ्यापान अभिनेत्रींना बघतो त्यावेळी सहजच आपले मन त्यांच्याकडे आकर्षित होते. बॉलीवूड मध्ये अशा अनेक सुंदर अभिनेत्री आहेत. यामध्ये काही अभिनेत्री नैसर्गिक रित्या गोऱ्या आहेत तर काही सावळ्या. आशा बऱ्याचशा अभिनेत्री आहेत ज्या इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी सावळ्या होत्या ‌.आज आम्ही तुम्हाला अशाच चार अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत ज्या सावळ्या असून देखील बॉलीवूड विश्वात स्वतःचे नाव कमवत आहेत. या अभिनेत्रींनी जगाला दाखवून दिले आहे की रंग सावळा जरी असला तरी अंगातील कौशल्य ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या व्यक्तिमत्वामुळे आणि कौशल्य गुणांमुळे ग्लॅमरच्या या चमकदार जगात या अभिनेत्रींनी स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

१) राणी मुखर्जी – एकेकाळी बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली राणी आता एका मुलीची आई आहे. एकेकाळी राणीने सलग तीन वर्षे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला होता. राणी मुळची बंगालमधली. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी पासून चित्रपटांसोबत नाते होते. तिचे वडील बंगालमधील चित्रपटांचे दिग्दर्शक होते तर आई पार्श्वगायिका होती. राणीने देखील सावळ्या अभिनेत्री मधील एक अभिनेत्री आहे. जर राणीला कोणी मेकअप नसताना बघितले तर त्यांना जाणवेल की पडद्यावर चांदणी सारखी चमकणारी राणी खऱ्या आयुष्यात मात्र सावळी आहे.
२) शिल्पा शेट्टी – स्वतःच्या घायाळ अदांनी युपी-बिहार लुटणारे शिल्पा शेट्टी लाखो हृदयांची धडकन आहे. शिल्पाने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले त्यावेळी तिचा रंग सावळा होता परंतु स्किन लाइटनिंग ट्रीटमेंट मदतीने तिने तिची त्वचा गोरी करून घेतली. आता ते खूप सुंदर दिसते. १९९३ मध्ये आलेल्या बाजीगर या चित्रपटांमधून शिल्पाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी ती खूपच सावळी होती. परंतु मेकअपच्या कामाला मुळे ती चित्रपटांमध्ये गोरी दिसली होती.
३) बिपाशा बासू – बिपाशा बासू ही भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री व मॉडेल आहे. बिपाशा चा जन्म ७ जानेवारी १९७९ रोजी दिल्लीमध्ये झाला होता. बिपाशाने हिंदी चित्रपट आणि व्यतिरिक्त बंगाली, इंग्लिश, तेलुगु आणि तामिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा जन्म झाला दिल्लीमध्ये झाला असला तरी बालपण मात्र कोलकातामध्ये गेले. बिपाशाने १९९६ मध्ये गोदरेज सिंथोल सुपरमॉडेल हा किताब जिंकला. जेव्हा विपाशा बॉलीवूड मध्ये आली त्यावेळी ती खूप सावळी होती परंतु तिच्या मादक व घायाळ अदांमुळे तिने इतर अभिनेत्रींना मागे टाकले. परंतु निरखून पाहायला गेल्यास पहिली बिपाशा व आताची बिपाशा यात जमीन आस्मानाचा फरक आहे.
४) लारा दत्ता – एकेकाळची मिस युनिव्हर्स झालेली लारा दत्ता खुप सुंदर आहे. लारा चे नाव देखील बॉलिवूडमधल्या सावळ्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. परंतु लाराने गोरी होण्यासाठी कधीही कोणत्याही स्कीम ट्रीटमेंटची मदत घेतली नाही. ते सावळे असून देखील आकर्षक व सुंदर दिसते. गाण्याचे फिल्मी करिअरची सुरुवात अक्षय कुमारच्या अंदाज या चित्रपटांमधून केली होती. लारा तिचा हसरा चेहरा व मादक शरीरासाठी ओळखले जाते. लाराने टेनिस प्लेयर महेश भूपती सोबत लग्न केले. सध्याला लारा चित्रपट सृष्टीपासून दूर असून ती स्वतःचे घर सांभाळण्यात व्यस्त आहे.