शुटिंग दरम्यान प्रेमात पडल्या या बॉलिवूडच्या जोडया, नं ४ ची जोडी आहे खूप लोकप्रिय !

3 Min Read

बॉलिवूडमधील अफेअरच्या चर्चा तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच जोड्या बद्दल सांगणार आहोत ज्यांचे प्रेम शुटिंगदरम्यान जमले.

१) सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रे :- सुनील शेट्टी व सोनाली बेंद्रे यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत काम केले. चित्रपटांमध्ये काम करता करताच दोघांमधील जवळीक वाढली होती. परंतु सुनील शेट्टीचे आधीपासून लग्न झाले होते त्यामुळे सोनाली आणि सुनील एकत्र येऊ शकले नाही.२) ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन :- अभिषेक व ऐश्वर्याने बंटी ओर बबली या चित्रपटातील कजरा रे या गाण्यात एकत्र काम केले होते. असे म्हटले जाते की या गाण्याच्या चित्रीकरणा दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर अभिषेखने ऐश्वर्यासोबत लग्न केले. कूच ना कहो, गुरु, रावण, दाही अक्षर प्यार के, सरकार राज यांसारख्या चित्रपटात ऐश्वर्या व अभिषेखने एकत्र काम केले आहे. त्यांना आता एक आराध्या नावाची मुलगी असून ती ८ वर्षांची आहे.३) ह्रितिक रोशन आणि करीना कपूर :- मै प्रेम कि दिवानी हु या चित्रपटात ह्रितिक व करीनाने एकत्र काम केले होते. या चित्रपटातील त्यांची जोडी प्रेक्षकांच्या सुद्धा पसंतीस उतरली होती. त्यावेळी मिडिया मध्ये या दोघांचे अफेयर आहे अशा चर्चांना सुद्धा उधाण आले होते. परंतु या दोघांनी लवकर विभक्त होण्याचा निर्णय घेतला असे म्हटले जाते. करीना व ह्रितिकने यांदे, कभी ख़ुशी कभी गम, मुझसे दोस्ती करोगे यांसारख्या चित्रपटामध्ये काम केले होते.
४) जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख :- रितेश देशमुख ने जेनेलिया डिसूजा सोबत तुझे मेरी कसम या चित्रपटात काम केले होते. नुकतेच या चित्रपटाला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात संबंधित आठवणींना उजाळा देण्यासाठी रितेश व जेनेलियाने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वर या चित्रपटामधील गाण्यावर व्हिडीओ शूट करून टाकला आहे. सध्या इंटरनेटवर हा व्हिडिओ तुफान गाजत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकणादरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. खूप वर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०१२ मध्ये दोघे विवाह बंधनात अडकले.५) रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण :- आतापर्यंत दीपिका व रणवीर ने अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. परंतु या दोघांची खरी प्रेम कहाणी गोलियों की रासलीला रामलीला या चित्रपटापासून सुरु झाली. नोव्हेंबर २०१८ मध्ये दीपिका व रणवीर ने लग्न केले. दीपिकाचा छपाक हा चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होईल.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *