मित्रांनो जवळपास सर्वच देश आपल्या देशात काहीतरी उत्पादन घेतात आणि जगभरात निर्यात करतात. आज ह्या लेख मध्ये आम्ही तुम्हाला आज अश्या काही गोष्टी सांगणार आहोत ज्या पाकिस्तानात बनतात आणि त्या आपल्या देशात आवडीने खाल्या जातात आणि भरपूर खपतात सुद्धा. भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे शत्रू असले तरी व्यापाराच्या बाबतीत सर्व संबंध बाजूला ठेऊन आपली आर्थिक परिस्थिती सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक देशाची आर्थिक स्थिती त्या देशाची निर्यात ठरवते. ज्या देशाची निर्यात जास्त आणि आयात कमी त्या देशाची आर्थिक स्थिती चांगली मानली जाते.

१) सैंधव मीठ :- सैंधव मीठ किंवा काळे मीठ आपण सर्वांनीच खाल्लं असेल. हे मीठ व्रत चालू असताना खाल्ले जाते. हे मीठ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले मानले जाते. सैंधव मीठ हे रक्तदाब, ऍनिमिया आणि पचनामध्येही फायदेशीर ठरते. हे सैंधव मीठ आपल्याला पाकिस्तानच निर्यात करतो.२) सल्फर :- सल्फर चा उपयोग आरोग्यासाठी अनेक कारणांसाठी होतो. सर्वात जास्त ह्याचा उपयोग केसांच्या उत्पादनासाठी आणि त्वचेवरील फंगल इन्फेक्शन घालवण्यासाठी केला जातो. सल्फर च्या दगडाचा चुना आणि सिमेंट ची निर्यात सुद्धा पाकिस्तानातूनच होते.
३) सिमेंट :- भारत हा विकसनशील देश असल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात बांधकामासाठी सिमेंट ची आयात केली जाते. मोठ्या मोठ्या इमारती, पूल, मेट्रो ची कामे, इंडस्ट्रीज सेटअप करण्यासाठी पाकिस्तानपेक्षा भारतातच सिमेंट चा वापर सर्वात जास्त केला जातो आणि हे सिमेंट आपल्याला पाकिस्तानातच निर्यात करतो आणि भरपूर नफा कमावतो. भारतातील कंपन्यांपेक्षा पाकिस्तानातील सिमेंट हे स्वस्त मिळते त्यामुळे कंपन्या पाकिस्तानच्या सिमेंटलाच जास्त पसंती देतात.४) चामडे :- चामड्याचा उपयोग भारतात भरपूर प्रमाणात केला जातो. चामड्याच्या बॅगा, कंबरेला लावायचा पट्टा, पाकिटं, जॅकेट ह्या सर्व गोष्टी चामड्याच्या बनतात. आपल्या देशात चामड्याचे उत्पादन भरपूर होते. पण काही प्रकारचे चामडे पाकिस्तानातून निर्यात केले जाते.५) मुल्तानी माती :- मुल्तानी मातीच्या चेहेऱ्यावर होणाऱ्या वापराबद्दल सर्वांनाच माहिती आहे. मुल्तानी मातीचा उपयोग चेहेऱ्यावर तेज आणण्यासाठी केला जातो. सौंदर्यप्रसाधनांमध्ये केल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये मुल्तानी मातीचा वापर केला जातो जी पाकिस्तानातून निर्यात केली जाते आणि भारतात भरपूर आयात केली जाते.६) तांबे :- तुम्हाला विश्वास बसेल कि नाही माहिती नाही पण आपल्या घरात असलेली तांब्याची भांडी सुद्धा पाकिस्तानातून निर्यात केलेली असू शकतात. भारतात तांबे मोठ्या प्रमाणात पाकिस्तानातूनच आयात केले जाते. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. तांबे शरीरातल्या अनेक प्रकारच्या जीवाणूंचा खात्मा करते जे डायरिया आणि पिलिया सारख्या रोगांना कारणीभूत ठरतात.पाकिस्तानातून आयात करण्याचं मोठं कारण म्हणजे त्यांचे स्वस्त दर. काश्मीर प्रश्नावरून भारत-पाकिस्तान संबंध ताणले जाऊन दोन्ही देशांमध्ये सीजफायर उल्लंघन होते आणि काही काळासाठी दोन्ही देशांमधला व्यापार बंद पडतो. भारतात चीन च्या वस्तूंवर नागरिक बंदी घालतात पण पाकिस्तान पण आपल्याला अनेक बहुपयोगी गोष्टी निर्यात करतो आणि आपण नकळत त्या वापरतो सुद्धा. आंतरराष्ट्रीय नियमानुसार कोणत्याही देशावर अशी अचानक बंदी घालता येत नाही पण मागणी कमी झाल्यास आयात कमी करता येऊ शकते. ह्या बंदीचा सर्वात जास्त फटका पाकिस्तनपेक्षा भारतालाच जास्त बसतो. त्यामुळे सहसा भारत पूर्णपणे पाकिस्तानवर व्यापार बंदी करणार सुद्धा नाही.