बॉलीवूड कलाकार व त्यांचे वैयक्तिक जीवन हे नेहमीच चर्चेचा विषय ठरते. बॉलीवूड कलाकारांचा डामडौल हा नेहमीच मोठा असतो. ते आलिशान जीवन जगण्यात जास्त पसंती देतात. ते जेथे कुठे जातील तेथे त्यांच्या आजूबाजूस व्हॅनिटी व्हॅन व गार्डसचा गराडा असतो. एक व्हॅनिटी व्हॅन तयार करण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च येतो. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे काही कलाकारांच्याबॉलीवूड कलाकार व त्यांचे वैयक्तिक जीवन हे नेहमीच चर्चेचा विषय ठरते.

बॉलीवूड कलाकारांचा डामडौल हा नेहमीच मोठा असतो. ते आलिशान जीवन जगण्यात जास्त पसंती देतात. ते जेथे कुठे जातील तेथे त्यांच्या आजूबाजूस व्हॅनिटी व्हॅन व गार्डसचा गराडा असतो. एक व्हॅनिटी व्हॅन तयार करण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च येतो. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे काही कलाकारांच्याबॉलीवूड कलाकार व त्यांचे वैयक्तिक जीवन हे नेहमीच चर्चेचा विषय ठरते. बॉलीवूड कलाकारांचा डामडौल हा नेहमीच मोठा असतो. ते आलिशान जीवन जगण्यात जास्त पसंती देतात. ते जेथे कुठे जातील तेथे त्यांच्या आजूबाजूस व्हॅनिटी व्हॅन व गार्डसचा गराडा असतो. एक व्हॅनिटी व्हॅन तयार करण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च येतो. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे काही कलाकारांच्या व्हॅनिटी गाड्यांची माहिती देणार आहोत.

शाहरुख खान – बॉलिवूडचा रोमान्स किंग असलेल्या शाहरुख खान कडे 14 मीटर लांब Volvo 9 BR बस आहे. जिची किंमत २००५ मध्ये चार करोड रुपये एवढी होती. शाहरुख खानच्या या व्हॅनिटी बस मध्ये चार खोल्या व एक जिम आहे.
सलमान खान – बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान कडे बॉलीवूड मधील सगळ्यात स्टायलिश व्हॅनिटी व्हॅन आहे. त्याच्या या व्हॅनिटी व्हॅनमध्ये एक रिहर्सल रूम, एक मिटिंग रूम आणि एक मोठी बेडरुम आहे. त्याच्या या गाडीची किंमत तब्बल पाच करोड रुपये इतकी आहे.
ऋतिक रोशन – बॉलीवूड चा फिट आणि हँडसम अभिनेता म्हणजेच ऋतिक रोशन कडे सुद्धा अलिशान व्हॅनिटी आहे. या व्हॉनिटीच्या पुढील भागात ऑफिस बनवले आहे तर त्याच्यापुढे लॉउंज बनवले आहे. यावेळी गाडीची किंमत ४.५० करोड रुपये इतकी आहे. हृतिक रोशनचा नुकताच येऊन गेलेला वॉर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच ब्लॉकबस्टर ठरला.
अजय देवगन – बॉलिवूडचा ॲक्शन हिरो असणाऱ्या अजय देवगनकडे सुद्धा स्वतःची वैयक्तिक व्हॅनिटी बस आहे. ही बस बाहेरून दिसायला एकदम स्टायलिश दिसते. या व्हॅनिटीमध्ये अजयने जिम, किचन, बेडरुम व रेस्टरुम बनवली आहे. सध्या अजय देवगनचा तानाजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
संजय दत्त – संजय दत्तकडे व्हॅनिटी Volvo B7R आहे. ती बनवायला संजयने तब्बल तीन करोड रुपये खर्च केले. ह्या व्हॅनिटी च्या आतील दृश्य एअरफोर्स १ सारखे मिळतेजुळते आहे. संजय दत्त मागील चित्रपट पानिपत बॉक्स ऑफिस वर तितकासा चालला नाही.
महेश बाबु – टॉलीवूड कडील सुपरस्टार महेश बाबू यांचे देखील जीवन बॉलिवुडच्या सुपरस्टार पेक्षा कमी नाही. महेश बाबू यांच्याकडील व्हॅनिटी बस ही बॉलीवूडच्या मंडळी पेक्षा कित्येक पटीने सुंदर व महागडी आहे. त्यांच्याकडे असलेल्या व्हॅनिटी व्हॅन ची किंमत साधारण सहा करोड रुपये इतकी आहे. किंबहुना महेश बाबू च्या व्हॅनिटी व्हॅन ची किंमत ही शाहरुख खानच्या अपेक्षा अधिक आहे‌.
अल्लू अर्जुन – या यादीत अल्लू अर्जुन यांचे नावं टॉप लिस्ट ला आहे कारण त्यांच्या व्हॅनिटीची किंमत ही सलमान खान , शाहरुख खान यांच्या व्हॅनिटीपेक्षा सुद्धा जास्त आहे. ही व्हॅनिटी तब्बल सात करोड रुपयांची आहे.