दीपिका चिखलिया, देबिना, स्मृति ईरानी यांच्या सहित या ११ अभिनेत्रींनी साकारली सिता मातेची भूमिका !

3 Min Read

रामानंद सागर यांची सिरीयल रामायण लॉकडाउन मध्ये दूरदर्शन वर प्रसारित करण्यात आली होती. या सिरीयलला दर्शकांनी भरभरून प्रेम दिले, ज्यामध्ये सीता मातेची भूमिका दीपिका चिखलियाने केली होती. दीपिकाने सिताची भूमिका केल्यामुळे लोक तिला खरी सीता समजून तिच्या पाया पडू लागले होते. आजही लोक सीता म्हणूनच ओळखतात. पण टीव्ही वर दीपिकाशिवाय बऱ्याच अभिनेत्रींनी सीता मातेची भूमिका साकारली आहे. अशाच काही अभिनेत्रींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

दीपिका चिखलिया :- रामानंद सागर यांची सिरीयल रामायण मध्ये सीतामाताची भूमिका दीपिका चिखलियाने अशाप्रकारे साकारली होती कि लोक आजही तिची पूजा करतात. लॉकडाउन मध्ये जेव्हा रामायण पुन्हा प्रसारित करण्यात आले त्यावेळी सिता मातेची अग्निपरीक्षा हा एपिसोड पाहून लोक भाऊक झाले होते. तीन दशकांपूर्वी दीपिका चिखलियाने सीतामातेची भूमिका साकारली होती. त्याच भुमिकेमध्ये लोक तिला आजही पाहतात.स्मृति इरानी :- २००१ मध्ये बी.आर. चोपड़ा आणि रवि चोपड़ा यांनीसुद्धा रामायण सिरीयल बनवली होती. ज्यामध्ये स्मृति इरानीने सीतामातेची भूमिका केली होती आणि नीतीश भारद्वाज रामाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले होते. हि सिरीयल दर्शकांना जास्त आवडली नाही.देबीना बनर्जी :- टीव्ही अभिनेत्री देबीना बनर्जीने टीव्हीवर सिताची भूमिका साकारली होती. देबीनाने २००८ मध्ये रामायण सिरीयल मध्ये सीतामातेची भूमिका केली होती. हि सिरीयल रामानंद सागर यांचा मुलगा आनंद सागर यांनी बनवली होती. हि सिरीयल सफल देखील राहिली आणि देबीनाला सीता मातेच्या भुमिकेत लोकांनी पसंत देखील केले.रुबीना दिलैक :- लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैकने टीव्ही शो देवों के देव महादेव मध्ये सीतामातेची भूमिका साकारली होती.नेहा सरगम :- २०१२ मध्ये आलेल्या सिरीयल रामायण: सबके जीवन का आधार मध्ये अभिनेत्री नेहा सरगमने सीताची भूमिका साकारली होती. हि सिरीयल सागर आर्ट्सची तीसरी रामायण सीरीज होती पण ती फ्लॉप झाली.मल्लिका सिंह :- राधाकृष्ण मध्ये अभिनेत्री मल्लिका सिंह राधाच्या भूमिकेशिवाय इतर भूमिकेमध्ये सुद्धा आहे, ज्यामध्ये एक सिता माताची भूमिका देखील आहे.देबलीना चटर्जी :- टीव्ही शो संकट मोचन महाबली हनुमान मध्ये माता सीतेची भूमिका अभिनेत्री देबलीना चटर्जीने साकारली होती.मदिराक्षी मुंडले :- टीव्ही शो सिया के राम मध्ये अभिनेत्री मदिराक्षी मुंडलेने सीता मातेची भूमिका साकारली होती. दर्शकांना हि सिरीयल खूपच आवडली. मदिराक्षीने सीतामातेची भूमिका चांगल्या प्रकारे केली होती. त्यात कुठलीही कसर सोडली नाही.शिव्या पठानिया :- टीव्ही अभिनेत्री शिव्या पठानियाने राम सिया के लव कुश मध्ये सीताची भूमिका केली होती, पण हि सिरीयल दर्शकान जास्त पसंत नाही आली.नम्रता थापा :- २००६ मध्ये आलेल्या टीव्ही शो रावण मध्ये अभिनेत्री नम्रता थापा सीता मातेच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाली होती.शिल्पा मुखर्जी :- अभिनेत्री शिल्पा मुखर्जी माहिती आहे का? शिल्पाने संजय खानचा हिट टीव्ही शो जय हनुमान मध्ये सीतामातेची भूमिका केली होती. शिल्पा मुखर्जी आता अॅक्टिंगच्या जगतापासून दूर एक प्रोफेशनल फ्रीलांस फोटोग्राफर आहे.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *