लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन असतं. लग्नानंतर पती पत्नी एकमेकांसोबत एका घरामध्ये राहतात. पण आजकालच्या धावपळीच्या व्यस्त जीवनामध्ये एकमेकांना भेटणं एकमेकांसोबत वेळ घालवणं फार कमी झालेलं दिसून येत. अशाच एका अभिनेत्री बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत जी वर्षातून फक्त बारा दिवस आपल्या नवर्‍याला भेटते त्याच्यासोबत वेळ घालवते. चला तर मग पाहूया कोण आहे ही अभिनेत्री ?ज्या अभिनेत्री बद्दल आपण आता बोलत आहोत या अभिनेत्रीचं नाव आहे राधिका आपटे. राधिका ही चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून आपल्या परिचयाचीआहे. राधिका आपटेने २००५ मध्ये ‘वाह’ आणि ‘लाईफ हो तो ऐसी’ या चित्रपटांतून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं.

आजतागायत तिने हिंदी तेलुगू तमिळ मल्याळम मराठी आणि बंगाली या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. राधिका चा जन्म तमिळनाडूमधील वेल्लोरे या गावी झाला त्यानंतर ती पुणे येथे राहायला आली. तिने नाटकांमध्ये देखील काम केले आहे.

२०१२ मध्ये तिने लंडनमधील प्रसिद्ध संगीतकार बेनेडिक्ट टेलर याच्याबरोबर लग्नबंधनात अडकली. आता जवळ जवळ त्यांचा लग्नाला ८ वर्ष झाली आहेत अन अजूनही ती स्वतःच्या नवऱ्याला क्वचित भेटते. माध्यमांसोबत बोलताना तिने सांगितलं की ते दोघ महिन्यातून एकदाच एकमेकांना भेटतात. यामागील कारण हेच की ते दोघेही आपल्या कामात फार व्यस्त असतात. राधिका हे देखील म्हणाली की प्रेम म्हणजे फक्त एकत्र 24 तास एका घरात राहणं नसतं.
राधिका आपटेचं लग्न किंवा तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीच लग्न होऊन 8 वर्षे झाली याबद्दल तर अजिबातचं कोणाला कल्पना नसेल. कामामध्ये फार व्यस्त असल्याने राधिका व तिचा पती फार क्वचित म्हणजे फक्त महिन्यातून एकदा भेटतात. म्हणजे 365 दिवसांपैकी 12 दिवस ते एकमेकांना भेटतात आणि बाकीचे दिवस एकमेकांच्या आठवणीत जगतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.