बॉलीवूड फिल्मी जगतामध्ये अनेक नाती बनतात आणि बिघडतात. या इंडस्ट्रीमध्ये आजपर्यंत अनेक जोड्या बनल्या. अनेक हीरो-हिरोइन दरम्यान नाते सुरु झाले. ज्यामधील काही नाती लग्नापर्यंत पोहोचली तर काही अपूर्ण राहिली. तथापि बॉलीवूडमध्ये अक्षय कुमार -ट्विंकल खन्ना, शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा सारखे कपल आहेत जे अजूनदेखल आपले मॅरिड लाईफ जगत आहेत. पण आज आपण अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या घटस्फोटानंतर सिंगल लाईफ जगत आहेत.
अमृता सिंह: अमृता सिंह बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्यापेक्षा १२ वर्षाने लहान सैफ अली खानसोबत तिने लग्न केले होते. अमृता आणि सैफची पहिली भेट बेखुदी चित्रपटाच्या सेटवर झाली होती. १९९१ मध्ये दोघांनी लग्न केले. तथापि नात्यामध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि १३ वर्षाने त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर अमृता अजून देखील सिंगल आहे.
जेनिफर विंगेट: टीव्ही जगतामधील प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट आपल्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे खूपच चर्चेत आली होती. जेनिफर, करण सिंह ग्रोवरची दुसरी पत्नी होती. २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले होते. जेनिफर-करणची जोड़ी ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन खूपच पसंद केली जात होती. तथापि २ वर्षामध्येच करण आणि जेनिफरचा घटस्फोट झाला. यानंतर करणने जिथे बिपाशा बसूसोबत लग्न केले तर जेनिफर अजून देखील सिंगल आहे.
पूजा बेदी: पूजा बेदी आणि फरहान फर्नीचरवालची लव स्टोरी खूपच चर्चेमध्ये राहिली. दोघांनी १९९४ मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर पूजाने दोन मुलांना जन्म दिला. पण नंतर पूजा आणि फरहानच्या आयुष्यामध्ये मतभेद निर्माण होऊ लागले ज्यानंतर त्यांनी घटस्फोटाचा मार्ग निवडला. पूजा आज देखील सिंगल आहे.
रीना दत्ता: १९९८६ मध्ये आमीर खान आणि रीना दत्ताने आपल्या कुटुंबाच्या विरुद्ध जाऊन लग्न केले होते. रीना आमिरची लहानपणीची मैत्रीण होती आणि हि मैत्री नंतर प्रेमात आणि लग्नामध्ये बदलली. आमीर आणि रीनाला दोन मुले आहेत इरा आणि जुनैद. तथापि २००२ मध्ये रीना आणि आमीरने परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.