बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ५४ व्या वाढदिवसाच्या दिवशी मामा बनला आहे. अभिनेता आयुष शर्मा आणि सलमान खानची लाडकी बहिण असलेल्या अर्पिता ने सलमान खान च्या वाढदिवसा दिवशी म्हणजेच २७ डिसेंबरला एका गोड मुलीला जन्म दिला आहे.

अर्पिता व आयुष दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. याआधी अर्पिता व आयुष्याला अहिल नावाचा तीन वर्षाचा मुलगा आहे. ही गोड बातमी आयुष व अर्पिताने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून चाहत्यांना दिली. आयुषने त्याच्या सोशल मिडीया अकाउंट वर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अर्पिता, अहिल, आयुष व त्यांची नवीन मुलगी आयात दिसते.

आयुषने जेव्हा त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून त्याच्या मुलीचा फोटो शेअर केला तेव्हा अवघ्या काही क्षणातच चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पाडला. माझी मुलगी आयाताचे या जगात आगमन झाले आहे. सर्वांनी अर्पिता व आयात वर प्रेमाचा वर्षाव केला आणि त्यांना आशीर्वाद दिलात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. असे गोड कॅप्शन आयुष्याने ह्या फोटोत करिता दिले होते.
अर्पिता ची डिलिव्हरी हे साधारण डिसेंबर महिन्यात होणार होती. आणि याच महिन्यात सलमान खानचा सुद्धा वाढदिवस असतो. त्यामुळे आपल्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी हटके गिफ्ट द्यावे असे त्याने ठरवले होते. म्हणून तिने सलमान खानच्या वाढदिवसादिवशी तिची डिलिव्हरी करून घेतली. भावाच्या वाढदिवशी एक गोड भाची गिफ्ट म्हणून दिली. अर्पिता आयुष चे २०१४ मध्ये लग्न झाले होते. या दोघांना तीन वर्षाचा अहिल हा मुलगा देखील आहे.

आपल्या वाढदिवसादिवशी दुसऱ्यांना मामा झाल्यामुळे सलमान खान खुशीत आहे. आयुष्य अर्पिता च्या मुलीच्या नावाबद्दल सुद्धा खूप चर्चा झाली. त्यावर अर्पिता ने सांगितले की सलमान ने सिफारा आणि आयात अशी दोन नावे सांगितली होती त्यातील आम्ही आयात हे नाव ठेवले.