बॉलीवूडचा भाईजान सलमानचे वय आता ५० वर्षांपेक्षा जास्त झाले आहे आणि त्याचा लग्न करण्याचा आता कोणताही हेतू दिसत नाही. जेव्हा कधी सलमान खानला त्याच्या लग्नाबद्दल विचारले जाते तेव्हा तो विनोद करत ती गोष्ट टाळतो. सलमान खानचे अनेक अभिनेत्रींसोबत खूप चांगले संबंध आहेत. या लेखामधून आम्ही अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी सलमान खानच्या खूप जवळ आहे. हि अभिनेत्री सलमानला कधीहि फोन करून बोलत असते.

आम्ही इथे ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरी कोणीही नसून अभिनेत्री डेजी शाह आहे. डेजी शाहला सलमानखानने जय हो चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये लाँच केले होते. डेजी शाह तिच्या करियरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे. तिला रेस ३ या चित्रपटामध्ये देखील पाहिले गेले आहे.नुकतेच एका न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये डेजी शाह ने स्वतः खुलासा केला आहे कि ती सलमानच्या खूपच जवळ आहे. डेजी शाहनुसार ती सलमान सोबत प्रत्येक गोष्ट शेयर करत असते. ती आपल्या पर्सनल लाइफमधील गोष्टीदेखील सलमानला सांगत असते. डेजी शाह म्हणाली कि मी कधी कधी त्याला फोन करून सल्ला सुद्धा घेते. मी कोणतीही गोष्ट सलमानपासून लपवत नाही.डेजी शाह म्हणाली कि पर्सनल लेवलवर आमची केमिस्ट्री खूपच चांगली आहे. आमच्या दोघांची इक्वेशन खूपच चांगली आहे. याअगोदर कोणत्याही अभिनेत्रीने सलमा खानच्या इतक्या जवळीकीबद्दल खुलासा केलेला नाही. सलमान खान सध्या आपल्या आगामी राधे या चित्रपटामुळे खूप चर्चेमध्ये आहे. सलमानचा हा चित्रपट याचवर्षी ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.