बॉलीवूडप्रमाणे साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत जे आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येक चित्रपट सुपरहिट करतात. त्याचबरोबर त्यांची फॅन फोलोइंगसुद्धा इतकी तगडी आहे कि फक्त फॅन्स च्या सपोर्टनेच अनेक चित्रपट हिट होतात. त्याचप्रमाणे साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा काही हीरो-हीरोइनच्या जोड्या आहेत ज्यांच्या फक्त नावानेच चित्रपट ब्लॉक बस्टर होतो. आज आपण अशाच काही साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील हीरो-हीरोइनच्या जोडींबद्दल जाणून घेणार आहोत.

राम चरण आणि काजल अग्रवाल :- या हीरो-हीरोइनच्या जोडीने एकत्र चार चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये मगधीरा (१५० करोड रुपये), नायक (५५ करोड रुपये), गोविंदुडु अंदरीवाड़ेले (४१.६५ करोड़ रुपये) आणि येवदु (६० करोड रुपये) हे चित्रपट सामील आहेत. या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर ३०६.६५ करोड इतकी कमाई केली आहे.विजय आणि समांथा :- विजय आणि समांथाची जोडी चित्रपटांमध्ये देखील खूपच सफल राहिली आहे. यांच्या एकत्र जोडीमध्ये बनलेले तीन चित्रपट कथ्थी, थेरी आणि मेर्सल बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट ठरले होते. या जोडीच्या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर ५६५ करोड इतकी कमाई केली आहे.नागार्जुन आणि अनुष्का शेट्टी :- एके काळी नागार्जुन आणि अनुष्का शेट्टीच्या जोडीला खूपच पसंत केले जात होते. यांच्या जोडीमध्ये बनलेले अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट राहिले आहेत. त्यांच्या हिट चित्रपटांमध्ये सुपर (२० कोटी रुपये), ओम नमो वेंकट्यास (४० कोटी रुपये), सोगगडे चिन्नी नयना (७५ कोटी रुपये), डमरूकाम (३५ करोड रुपये), किंग (४० करोड रुपये), डॉन (६३ करोड रुपये) आणि रगडा (२८ करोड रुपये) हे चित्रपट सामील आहेत. या जोडीच्या सर्व चित्रपटांनी एकूण ३०१ करोडची कमाई केली आहे.अल्लू अर्जुन आणि कॅथरीन ट्रेसा :- अल्लू अर्जुन आणि कॅथरीन ट्रेसाच्या जोडीने तीन मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अल्लू अर्जुन आणि कॅथरीन ट्रेसाचे चित्रपट सराइनोडु (१५४ करोड रुपये), रुद्रमादेवी (८६.९२ करोड रुपये) आणि इद्दाराममाईलाथो (७५ करोड रुपये) आहेत. या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर एकूण ३१५.९२ करोड रुपये इतकी कमाई केली आहे.प्रभास आणि अनुष्का शेट्टी :- या लिस्टमध्ये प्रभास आणि अनुष्का शेट्टीची जोडी सर्वात टॉपवर आहे. प्रभास आणि अनुष्का शेट्टीच्या या जोडीने बाहुबली, बाहुबली २, मिर्ची आणि बिल्लामध्ये एकत्र काम केले आहे. या जोडीच्या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर एकूण २५६४ करोड रुपये इतकी तगडी कमाई केली आहे.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.