४५ व्या दिवशी सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये आला टर्निंग पॉईंट, जाणून घ्या मोठया १० गोष्टी !

6 Min Read

दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी मुलाची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांसहित इतर ६ व्यक्तींविरुद्ध पटनामध्ये एफआईआर दाखल केली आहे. सुशांतचे वडील केके सिंहने पटना शहरच्या राजीव नगर ठाण्यामद्ये भादवि कलम ३०६, ३४१, ३४२, ३८०, ४०६ आणि ४२० अन्वये एफआयआर दाखल केली आहे. राजीव नगर पोलीस स्टेशनचे अतिरिक्त स्टेशन अध्यक्ष जोगेंद्र कुमारने मंगळवारी सांगितले कि सुशांत सिंहचे वडील केके सिंहने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांसोबत ६ लोकांचा विरुद्ध २५ जुलैला एफआयआर दाखल केली होती. पटनामध्ये एफआयआर दाखल केल्यानंतर या केसमध्ये ४५ व्या दिवशी खूप मोठा टर्निंग पॉईंट आला आहे. पटनामध्ये एफआईआरनंतर जाणून घ्या १० मोठ्या गोष्टी.१) अभिनेता सुशांत सिंह राजपूत (३४) चा मृ*तदे*ह मुंबईच्या बांद्रा स्थित त्याच्या अपार्टमेंटमध्ये मिळाला होता. मुंबई पोलीस घटनेनंतर तपास करत आहेत. मुंबई पोलिसांनी या प्रकरणामध्ये आता पर्यंत ३५ पेक्षा जास्त लोकांची चौकशी केली आहे, पण एक देखील एफआयआर दाखल झाली नाही.

२) २५ जुलैला दाखल झालेल्या एफआयआरमध्ये सुशांतचे वडील केके सिंह यांनी आरोप केला आहे की, रिया तिच्या कुटुंबातील सदस्य आणि सहाय्यक कर्मचार्यांवनी फसवणूक आणि बेईमानी केली. त्याला बराच काळ बंधक बनवून ठेवले आणि आपल्या आर्थिक लाभासाठी त्याच्या दबाव टाकून त्याच्या वापर केला आणि शेवटी माझ्या मुलाला आ*त्म*ह*त्या करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हंटले आहे कि २०१९ च्या अगोदर सुशांतला कोणताही मानसिक त्रास नव्हता. रियाच्या संपर्कामध्ये आल्यानंतर असे काय झाले कि त्याला समस्या आल्या, याची चौकशी झाली पाहिजे.३) केके सिंह यांनी म्हंटले कि, माझा मुलगा फिल्मी जग सोडून केरळमध्ये ऑर्गेनिक शेतीचा व्यवसाय करू इच्छित होता. पण रियाने याचा विरोध केला निया त्याला धमकावले कि जर त्याने असे केले तर त्याच्या उपचाराचे रिपोर्ट सार्वजनिक करेल.

४) त्यांनी म्हंटले कि रिया सुशांतसोबत राहत होती. आठ जूनला ती त्याच्या घरामधून रोख रक्कम, लॅपटॉप, एटीएम कार्ड, दागिने, बरेच सामान आणि उपचाराची कागदपत्रे आणि इतर महत्वाच्या गोष्टी घेऊन गेली. सुशांतच्या वडिलांनी आरोप लावला आहे कि त्यांच्या मुलाच्या खात्यामधून कमीत कमी १५ करोड रुपये अज्ञात खात्यामध्ये पाठवले गेले आहेत.५) सुशांतचे कुटुंब मुंबई पोलिसांच्या तपासावर समाधानी नाहीत यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी हे प्रकरण बिहार पोलिसांनी हाताळावे अशी मागणी केली आहे आणि कायद्यातही अशी तरतूद आहे. पटनामध्ये एफआईआर दाखल झाल्यानंतर केसला सीबीआईकडे सुपूर्द करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पण जर केस सीबीआईकडे गेली तर अशामध्ये फक्त सीबीआईच या केसचा तपास करेल.

६) पटनामध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर रिया चक्रवर्तीचे वकील आनंदिनी फर्नांडिस तिच्या घरी पोहोचली, जिथे अभिनेत्रीसोबत या प्रकरणाबद्दल दीर्घ काळ चर्चा झाली. रियाच्या घरून निघताना मीडियाकर्मींनी आनंदिनी फर्नांडिस यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ते कुणाशीही बोलले नाहीत.७) पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले कि पटना पोलीसच्या ४ सदस्यीय टीमने मुंबईमध्ये या केसचा तपास सुरु केला आहे. रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्तीला देखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे तर आता पटना पोलीस देखील रियाच्या भावाची चौकशी करण्याच्या तयारीमध्ये आहेत. सुशांत आणि शोविक चक्रवर्ती २०१९ मध्ये आर्टिफिशल इंटेलीजेंस कंपनी विविड रेज रियलिटिक्स नावाने एकत्र एक कंपनी उघडली होती. तथापि आतापर्यंत तपासामध्ये हे समोर आले आहे कि सुशांत या कंपनीचा एकटाच इन्वेस्टर होता. या प्रकरणामध्ये बिहार पोलिसांची टीम केससंबंधित पुरावे गोळा करण्यासाठी सुशांत सिंह राजपूतच्या मुंबई स्थित घरामध्ये जाणार आहे आणि मुंबई पोलीसांनी गोळा केले पुरावे देखील पाहणार आहे.

८) पटना पोलीस सुशांत सिंह राजपूतची बहिण मीतू सिंहचे स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहे. तपासाची सुरुवात मीतू सिंहच्या स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यापासून होईल कारण सुशांतच्या आ*त्म*ह*त्येच्या काही दिवसांपूर्वी ती सुशांतसोबत काही दिवस राहिली होती. तिला सुशांत आणि रियाच्या भांडणाबद्दल आणि रियाने सुशांतला मिडियासमोर त्याचा मेडिकल रिपोर्ट एक्सपोज करण्याची धमकी दिली होती, हे सर्व माहिती होते. सुशांतने याबद्दल बहिणीला सांगितले होते. पटना पोलीस तपासामध्ये हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे कि त्याचे रियासोबत शेवटचे बोलणे कधी झाले होते, कारण रियाने मुंबई पोलिसांच्या तपासामध्ये म्हंटले होते कि तिने घर सोडण्यापूर्वी सुशांतच्या बहिणीसोबत बातचीत केली होती.९) रिया चक्रवर्तीने केस जिंकण्यासाठी देशातील प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदेला हायर केले आहे. सतीश मानशिंदेने संजय दत्तची १९९३ ची मुंबई ब्लास्ट केस आणि सलमान खानची १९९८ मधील ब्लॅकबक केस लढली आहे.

१०) पटना पोलिसांच्या एफआयआरनंतर या प्रकरणात सीबीआय चौकशीची शक्यता वाढली आहे कारण सामान्यत: दोन राज्यांतील पोलिस एकाच प्रकरणाची चौकशी करू शकत नाहीत. सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून मंगळवारी ट्वीट करून या प्रकरणाची सीबीआई चौकशीची मागणी केली आहे. सुब्रमण्यम स्वामी आधीच या प्रकरणाच्या सीबीआई चौकशीसाठी पीएम नरेंद्र मोदी यांना लेटर लिहिले आहे. बीजेपी खासदार रूपा गांगुली, अभिनेता शेखर सुमन, बिहार विधानसभा विरोधी पक्ष नेता तेजस्वी प्रसाद यादव, जन अधिकार पार्टीचे नेते राजेश रंजन उर्फ पप्पू यादव, भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि माजी आमदार रामेश्वर चौरसिया यांनीदेखील सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआई चौकशीची मागणी केली आहे.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *