टीव्ही जगतामध्ये एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्री आहेत आणि आपल्या अभिनयाने त्यांनी लोकांना वेड लावले आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही कलाकारांबद्दल सांगणार आहोत जे अचानक टीव्हीवरुन गायब झाले आहेत. चला मग जाणून घेऊया त्यांच्या बद्दल.

राजश्री रानी पांडे :- टीव्ही जगतामधील अभिनेत्री राजश्री रानी पांडे ने सुहानी सी एक लड़की या शोमध्ये सुहानीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती २०१८ मध्ये इक्यावन शोमध्ये पाहायला मिळाली आणि त्यानंतर ती अचानक टीव्हीवरून गायब झाली.एकता कौल :- टीव्ही जगतामध्ये आपली खास ओळख बनवणारी अभिनेत्री एकता कौलला मेरे अंगने में या सिरीयलमध्ये शेवटचे पाहिले गेले होते. या सिरीयल मध्ये तिने रिया माथुरची भूमिका साकारली होती. आता ती टीव्हीवरून अचानक गायब झाली आहे. एकताने रब से सोना इश्क, बड़े अच्छे लगते हैं, ये है आशिकी, एक रिश्ता ऐसा भी , मेरे अंगने में सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे.दिशा वकानी :- सब टीव्हीवरील प्रसिद्ध शो तारक मेहता का उल्टा चश्मा मधील दयाबेन या नावाने प्रसिद्ध असणारी अभिनेत्री दिशा वकानी अचानक शोमधून गायब झाली. दिशाने लग्न केल्यानंतर शोमधून आई बनण्यासाठी सुट्टी घेतली होती परंतु त्यानंतर ती अजूनपर्यंत टीव्ही शोमध्ये पाहायला मिळालेली नाही. तिच्या भुमिकेमुळे तिला लोक अजूनही विसलेले नाहीत.रुचा हसब्निस :- स्टार प्लसवरील सर्वात लोकप्रिय सिरीयल साथ निभाना साथिया मधील राशी जिगर मोदी च्या भूमिकेमध्ये असलेली अभिनेत्री रुचा हसब्निस या शोमधून खूप पॉपुलर झाली होती. राशीची भूमिका जिवंत करण्यासाठी कठोर परिश्रम घेणारी अभिनेत्री आता आपले विवाहित जीवन एन्जॉय करत आहे. २०१५ मध्ये रुचाने आपला लहानपणीचा मित्र राहुलसोबत लग्न केले आणि आता ती त्याच्यासोबत खूप खुश आहे.