ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार बॉलीवूडमधील मोस्ट एडोरेबल कपलपैकी एक आहे. त्यांच्या लग्नाला आता २१ वर्षे झाली आहेत. या कपलला दोन मुले आहेत ज्यांची नावे आरव आणि नितारा आहेत. पण तुम्हाला हे माहिती आहे का कि नितारा म्हणजे दुसऱ्या मुलासाठी ट्विंकल खन्नाने अट ठेवली होती.

त्यांच्या मुली संबंधी हा किसा खूपच मजेदार आहे जो त्यांनी कॉफी विथ करणमध्ये शेयर केला होता. २०१६ मध्ये जेव्हा ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार या शोचा भाग बनले होते तेव्हा दोघांमधील केमिस्ट्री पाहून सर्वजण यांच्यासारखे कपल्स गोल्स बनवू लागले होते. बनवले देखील पाहिजेत अक्षय आणि ट्विंकल यांनी एक आनंदी कुटुंबाचे उदाहरण लोकांचा समोर मांडले आहे. असो या शोमध्ये त्यांनी एक मजेदार अटीबद्दल देखील बातचीत केली होती जी त्यांची मुलगी नितारा संबंधी आहे.

ट्विंकल खन्नाने सांगितले कि त्यांनी आपल्या दुसर्या मुलासाठी अक्षय कुमारसमोर एक कंडीशन ठेवली होती. ती कंडीशन हि होती कि अक्षयला दुसरे मुल हवे असेल तर त्याला सेंसिबल चित्रपट करावे लागतील. अक्षय कुमार कधीच आपल्या पत्नीची गोष्ट टाळत नाही. हि गोष्ट नुकतेच त्याने कॉफी विथ करणच्या ७ व्या सीजनमध्ये सांगितली आहे. अशामध्ये असे देखील म्हंटले जाऊ शकते कि त्याने हि कंडीशन मानली असेल.
ट्विंकल खन्नाने हे देखील सांगितले कि त्यांची लव्ह स्टोरी एक ब्रेकअपनंतर लगेच सुरु झाली होती. वास्तविक ती अक्षय कुमारला फ़िल्मफ़ेयरच्या एका शूट दरम्यान भेटली होती. अक्षय पहिल्याच भेटीमध्ये ट्विंकलच्या प्रेमात पडला होता. दुसरीकडे ट्विंकल खन्ना एक मोठ्या रिलेशनशिपमधून बाहेर पडली होती. अशामध्ये इतक्या लवकर परत रिलेशनशिपमध्ये पडण्याचा तिचा मूड नव्हता.