अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिचा जन्म देखील राजेश खन्ना यांच्या वाढदिवसादिवशी झाला होता. ट्विंकल इंटिरियर डिझायनर व लेखिका म्हणून खूप नाव कमावले आहे. २०१८ पर्यंत ट्विंकल ची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहे. याचप्रमाणे २०१० ते २०१८ दरम्यान ट्विंकल के सात चित्रपटांसाठी सहनिर्मातेची भूमिका सुद्धा निभावली ‌आहे. १९९५ ते २००१ दरम्यान ट्विंकलने १४ चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले होते. परंतु त्याकाळी इतर टॉपच्या अभिनेत्रींचा चांगलाच गाजावाजा झाला होता. यामुळे या स्पर्धेत ट्विंकल यशस्वी होऊ शकली नाही. २००१ मध्ये ट्विंकल ने अभिनेता अक्षय कुमार सोबत लग्न केले अभिनय क्षेत्रास पूर्णविराम दिला. आज आम्ही तुम्हाला ट्विंकल बदल अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

१) बरसात – राजकुमार संतोषी यांच्या १९९५ मध्ये आलेल्या बरसात या चित्रपटाद्वारे ट्विंकले बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती बॉबी देओलच्या विरुद्ध काम करत होती. चित्रपटासाठी ट्विंकल ची शिफारस धर्मेंद्र यांनी केली होती. आणि हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिने अजून दोन प्रोजेक्टवर सही केली होती. त्याकाळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता व त्या वर्षातील सहावा सर्वाधिक पैसा कमावणारा चित्रपट म्हणून देखील गौरवण्यात आला. या चित्रपटात ट्विंकल ने टीना ओबेरॉय ही भूमिका निभावली होती. बॉबी देओल सोबतची त्यांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली देखील होती.
२) जान – ट्विंकल चा १९९६ साली राज कंवर यांनी दिग्दर्शित केलेला जान हा सलग दुसरा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात ट्विंकलने अभिनेता अजय देवगन च्या विरुद्ध काजोलची भूमिका निभावली होती. या चित्रपटाने देखील त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. ट्विंकल ही इतर अभिनेत्री सारखे नसून तिच्यात काहीतरी वेगळे व खास गुण आहेत. तिचा अभिनय देखील खूप उत्तम आहे. भविष्यात तिच्याकडून अजून एकाहून एक सरस चित्रपट दिले जातील अशा प्रकारची मते समीक्षक व प्रेक्षकांनी दिली होती.
३) इंटरनॅशनल खिलाडी – ट्विंकल के इंटरनॅशनल खिलाडी या चित्रपटामध्ये अक्षय कुमार सोबत पहिल्यांदाच काम केले होते. या चित्रपटात तिने पायल या एका वेगळ्याच ढंगाच्या मुलीची भूमिका निभावली होती जी आधी बदल्याच्या भावनेने जळत होती तर कालांतराने ती प्रेमात आकंठ बुडालेली दाखवली गेली. या चित्रपटामुळे आयुष्यच बदलून गेले शिवाय तिला तिचा जीवनसाथी देखील मिळाला.
४) बादशाह – रोमँटिक चित्रपटांमध्ये दिसणारी ट्विंकल बादशाह चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर आली. या चित्रपटातील तिच्या भावाच्या खून्याचा शोध घेणारी मुलगी दाखवली गेली होती. या मुलीचे नाव सीमा मल्होत्रा असे होते. चित्रपटाच्या सुरुवातीला ती एका निरागस श्रीमंत मुलीची भूमिका साकारत असते तर, शेवटच्या काळात ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांची हत्या करण्याचा कट थांबविण्यास शाहरुख खानची मदत करणारी भूमिका साकारताना दिसली.
५) मेला – मेला चित्रपटातील रूपा सिंह ही ट्विंकल ची भूमिका प्रेक्षकांना आज देखील आठवणीत आहे. या चित्रपटात तिच्याविरुद्ध आमिर खान ने काम केले होते आमिर खान व कालची रोमँटिक केमिस्ट्री सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या चित्रपटात अदाकारीचे वेगवेगळे पैलू उत्कृष्टरित्या मांडले गेले होते.