माझे कपडे उंदराने कुरतडलेले, माझे महत्वाचे कागदपत्र उंदरांनी खाऊन टाकले अशी त्रस्त वाक्ये घराघरातून ऐकू येतात. घरात वावरणाऱ्या उंदरांचा सुळसुळाट त्यामुळे नागरिक हैराण झाले. या उंदरांना घालण्याचा खूप प्रयत्न केला तरी ते पटकन निघून जात नाहीत. घरात असणाऱ्या मौल्यवान आणि किमती वस्तूंची किंमत ही उंदराने कुरतडल्यावर एका मिनिटात ती कवडीमोलाची होते. यात घरातील कपडे, फर्निचर, पुस्तके महत्त्वाचे कागदपत्रे यांचा समावेश असतो. उंदरांना घालवण्यासाठी आपण बाजारातून महागडी औषधे किंवा स्प्रे विकत घेऊन येतो. उंदरांमुळे घरात दारिद्र्य पसरते असा समज आहे. त्याचप्रमाणे घरात उंदरांचा वावरामुळे आजारपण पसरते. उंदीर घरातील अन्नपदार्थांची देखील नासाडी करतात.

बाजारात उंदीर घालवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारची औषधे उपलब्ध आहेत पण त्यांचा वापर करण्यास आपण थोडे घाबरतो कारण घरात लहान बाळ, वयोवृद्ध माणसे असतात. या औषधांमध्ये उंदीर मारण्यासाठी विष असते त्यामुळे या औषधांचा संपर्क लहान बाळांसोबत आल्यास त्यांना हानी पोचू शकते या कारणामुळे आपण औषधे वापरण्यास थोडे घाबरतो. याव्यतिरिक्त उंदरांच्या शरीरावर देखील वेगवेगळ्या प्रकारचे जीव असतात. यामुळे लहान मुलांना वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागते. उंदराला घराबाहेर काढण्यासाठी सर्वजण वेगवेगळे उपाय आजमावत असतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे उंदीर घराबाहेर निघून जातील. आणि गंमत म्हणजे हे सगळं सामान तुमचा घरातच असते त्यासाठी बाजारातून कोणतेही वेगळे सामान आणण्याची गरज नाही आणि पैसे फुकट घालवायची आवश्यकता नाही.लाल मिरची पावडर – जेवणात वापरण्यात येणारा लाल मिरचीचा मसाला हा उंदरांना पळवण्यासाठी उत्तम उपाय आहे. तुमच्या घरात ज्या ठिकाणी उंदरांची ये-जा जास्त असते त्या ठिकाणी लाल मिरची पावडर घेऊन द्यावी. त्यामुळे उंदीर घरात प्रवेश करत नाही. परंतु ज्या घरात लहान मूल असते त्यांनी याबाबत सतर्क राहावे. लाल मिरची पावडरच्या संपर्कात लहान मुलांना येऊ देऊ नये कारण ही पावडर फार तिखट असल्यामुळे याचा लहान मुलांना त्रास होऊ शकतो.
तमालपत्र – जेवणात मसाल्यांमध्ये वापरण्यात येणारे तमालपत्र हे देखील उंदरांना पळवण्यासाठी उपयोगी येते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी चार ते पाच तमालपत्र जाळून ती घरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावी. तमालपत्र जाळल्यावर घराचे दरवाजे व खिडक्या थोड्या वेळासाठी बंद कराव्या जेणेकरून तमालपत्र मधून येणाऱ्या सुगंधामुळे उंदीर बिळावर पडून घराबाहेर जातात. तेज पत्ता जाळल्यामुळे फक्त अंधारच नाही तर घरामध्ये असलेले डास मच्छर देखील बाहेर जातात. याशिवाय तुमच्या घराचे वातावरण देखील शुद्ध होते.
पुदिन्याचे तेल – पुदिन्याच्या तेला च्या मदतीने उंदरांना सहज घराबाहेर काढू शकतो. कारण पुदिन्याचा गंध हा थोडा तिखट असतो जो उंदरांना बिलकुल आवडत नाही. यासाठी कापसाचे छोटे छोटे गोळे करून त्यात पेपरमिंट तेल लावा आणि ते अशा जागी ठेवा याठिकाणी उंदरांचा जास्त वावर असतो. ज्यावेळी उंदीर या कापसाच्या बोळ्याने जवळून जातात त्यावेळी त्यांना पुदिन्याच्या तेलाचा तिखट गंध सतावतो त्या गंधामुळे हैरान होऊन उजेडाच्या ठिकाणी जातात व घराबाहेर पडतात.
माणसांचे केस – ऐकून थोड आश्चर्य वाटेल पण हे खर आहे की माणसांच्या केसामुळे सुद्धा उंदीर पळून जातात. माणसांचे केस कुरतडल्यामुळे उंदरांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे उंदीर माणसाच्या केसांपासून दूर राहतात.