दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या सु*सा*ई*ड प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी तीन मानसोपचारतज्ज्ञ आणि मनोवैज्ञानिक यांचे जबाब नोंदवले आहेत. मुंबई पोलिसांनुसार सुशांत सिंह २०१९ नंतर उपचार करून घेत होता. मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून आता हैराण करणारी माहिती समोर आली आहे.पोलिसांच्या सूत्रांनुसार एक मानसोपचारतज्ज्ञाने सांगितले कि सुशांत सिंहला बाइपोलर डिसऑर्डर हा आजार होता, तर बाकी डॉक्टर्सनुसार सुशांत सिंहचे आयुष्य खूपच तणावामध्ये जात होते, पण या तणावाचे कारण काय होते या प्रश्नाचे उत्तर कोणताही डॉक्टर देऊ शकला नाही. आता डॉक्टर्सचे हेच उत्तर पोलिसांसाठी संभ्रम निर्माण करणारे आहे.विज्ञानाच्या भाषेत बाइपोलर डिसऑर्डर एक असा आजार आहे ज्यामध्ये रुग्णाच्या व्यवहारामध्ये खूपच वेगाने बदल होतात. याला मॅनिक डिप्रेशन असेदेखील म्हणतात. यामध्ये रुग्णाच्या मनामध्ये भावनात्मक रूपाने खूपच वेगाने उलथापालथ होत असते.डॉक्टर्सनुसार सुशांत सिंहला त्याच्यावर इलाज करणाऱ्या डॉक्टर्सवर देखील विश्वास नव्हता, कदाचित हेच कारण होते कि तो प्रत्येक डॉक्टरला जास्तीजास्त दोन किंवा तीन वेळा भेटत असे आणि नंतर डॉक्टर बदलत असे. सुशांत सिंहचा इलाज करत असलेल्या जवळ जवळ सर्व डॉक्टर्सनुसार तो औषधे देखील योग्यवेळी किंवा जास्त वेळ घेत नसे. शेवटचे त्याने ज्या डॉक्टर कडून इलाज करून घेतला होता ते डॉक्टर त्याला बाइपोलर डिसऑर्डरची ट्रीटमेंट देत होते.
लॉकडाउनमुळे एप्रिल नंतर सुशांत सिंहने डॉक्टरांकडे जाण्याऐवजी फोनवरच सल्ला घ्यायला सुरुवात केली. तथापि डॉक्टरांना वाटते गेल्या दोन किंवा तीन महिन्यांमध्ये सुशांत सिंहने औषधे घेणे बंद केले होते आणि त्याला दिले जात असलेले सल्ले देखील तो अमलात आणत नव्हता.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.