भरपूर पैसे कमविणे आणि ऐशो आरामात जीवन व्यतित करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी प्रत्येक व्यक्ती जीवाचे रान करून मेहनत करीत असतो. गरिबीत हालअपेष्टा सहन करत यशस्वी होत श्रीमंत होणारे अनेकांनी पहिले आहेत परंतु एखाद्या श्रीमंत व्यक्तीने रस्त्याच्या कडेला एखादे दुकान लावलेले नाही पहिले. तुम्ही असे पहिले आहे का? नाही ना! हो, सगळ्यांना ऐकून आश्चर्यच वाटेल. काय गरज आहे ? रस्त्याच्याकडेला दुकान लावायची. ते तर आधीच गर्भश्रीमंत आहेत. आज अश्याच एका महिलेबद्दल आपणास आम्ही सांगणार आहोत. हि महिला ३ कोटी किंमत असलेल्या घरात राहूनसुद्धा एक दुकान चालवितात. हि विचित्र बाब आहे पण घटना सत्य आहे. चला तर जाणून घेऊया “या” महिलेबद्दल.

‘उर्वशी यादव” असे या महिलेचे नाव आहे. त्या गुडगावमध्ये 3 कोटीं किंमत असलेल्या घरात राहतात. त्यांच्याकडे एसयुव्ही गाडी आहे. एवढे असूनतरी तुम्ही त्यांना “छोले कुल्चे” ची गाडी असलेले छोटेसे दुकान रस्त्याच्याकडेला लावलेले पाहाल. स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्याकरीत्या त्यांनी हा निर्णय घेतला. एका दुर्घटनेत त्यांचे पती खूप जखमी झाल्यामुळे त्यांना शारीरिक इजानां सामोरं जावं लागले.

या घटनेमुळे कुटुंबावर संकट कोसळले. त्यातच डॉक्टरांनी सहा महिन्यानंतर हिप रिप्लेसमेंट सांगितल्यामुळे त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे लागणार होते. म्हणून त्यांनी स्वतः काम करण्याचा निर्णय घेतला. काहीकाळ उर्वशी यांनी नर्सरीत मुलांना शिकविण्याचे काम केले पण मिळणारा पगार हा तुटपुंजा होता. त्यातून बचत होऊ न शकल्याने त्यांनी स्वतः नवीन काहितरी करण्याचा निर्णय घेतला.उर्वशी यांचे असे म्हणणे आहे कि, जरी आज आम्ही आर्थिकदृष्टया सबळ असलो तरी भविष्यात सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून हे मी पाऊल उचलले. उर्वशी यांना जेवण बनवण्याची प्रचंड आवड आहे. हि आवड लक्षात ठेवून त्या आवडीचे रूपांतर व्यवसायात गुंतवणूक करण्याचे त्यांनी ठरविले. उर्वशी यांचे पती अमित यादव हे एका प्रसिद्ध कंपनीत कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

त्यांचे सासरे हे भारतीय वायू सेनेत सेवा निवृत्त विंग कमांडर आहे. ३१ मे २०१६ रोजी अमित यादव सेक्टर १७ अ मध्ये पडले. डॉक्टरांनी डिसेंबर महिन्यात एक सर्जरी करण्याचे सुचविले होते. ह्या दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी सेक्टर १४ च्या एका झाडाखाली दुकान लावण्यास सुरुवात केली. उर्वशी यांना असे वाटते कि, भविष्यात त्यांच्या मुलांना शिक्षणासंबधित कोणतीच अडचण येऊ नये, कुटुंबाला कोणतीच आर्थिक समस्या येऊ नये. याकरीता अपार मेहनत करीत आहेत.

उर्वशी यांना यश मिळण्यासाठी अपार कष्ट आणि संघर्ष करावे लागले. दुकान लावण्याच्या निर्णयाला घरातून विरोध होता पण आपली आवड आणि कुटुंबावर आलेलेे आर्थिक संकट याचा विचार आधी केला. कारण उर्वशी या सुसंकृत आणि उच्चशिक्षित असल्याने कुटुंबतील सदस्यांनी विरोध दर्शिवला होता. त्यांचा प्रवास हा एअरकंडिशनर असलेल्या गाडीतून असायचा. महिंद्रा स्कॉर्पिओ आणि हुंडाई क्रेटाची मालकीण अश्या पद्धतीने रस्त्याचाकडेला दुकान लावणार असणार तर साहजिकच विरोध हा होणारच.उर्वशी यांचे सासरे एक दुकान टाकण्याकरीता मदत करण्यास तयार होते पण उर्वशी यांनी स्पष्ट नकार दिला. जेव्हा छोले कुलचे ची हातगाडी असलेले दुकान हे लवकरच एक दोन दिवसात बंद होईल. असा घरातील सदस्यांना विश्वास होता पण असे काही झाले नाही. उलट एक दोन महिण्यातच त्यांच्या “छोले कुल्चे” दुकानाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. उर्वशी यादव ह्या आर्ट शाखेतून ग्रॅज्युएट आहे.

त्यांनी फर्राटेदार इंग्लिशमध्ये ग्राहकांशी संवाद साधत आपल्या शिक्षणाच्या आधारावर ग्राहकांच्या हृदयात स्थान मिळविले. समाधानकारक यश मिळाल्यानंतर त्यांना एक रेस्टाँरन्ट उभारण्याची सुप्त इच्छा त्यांनी सांगितली. अश्या रीतीने आवडीच्या कामामुळे त्यांना आत्मविश्वास मिळाला. त्यांनी एक गोष्ट सिद्ध केली कि, जर महिलांनी कोणतेही कार्य मानापासून हाती घेतल्यास त्यास पूर्णत्व प्राप्त होतेच आणि कुटुंब-संसारवर कितीही अडचणी आल्यास त्यांचा सामना करण्यास महिला समर्थ असतात. असे अनेक लेख वाचण्यासाठी लाइक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.