भारताला जशी हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा लाभली आहे, तशीच खाद्य संस्कृती देखील फार विविधता असलेली लाभली आहे. भारतीय लोक खवय्ये म्हणून ओळखले जातात. भारताची प्रांतवार रचना असल्यामुळे या विविधतापूर्ण असलेल्या खाद्यसंस्कृतीत आणखीन भर पडत जाते. मात्र या खाण्याच्या मोहापायी आपण अनेकदा असे पदार्थ खातो. ज्यांच्याबद्दल आपल्याला खरंच माहीत नसते हे व्हेज आहेत की नॉनव्हेज. चला तर मग आज जाणून घेऊयात अशाच काही पदार्थांबद्दल.

साखर : दैनंदिन वापरातील एक पदार्थ.. सकाळी लागणाऱ्या चहापासून ते दिवसभरातील अनेक खाद्यपदार्थांमध्ये साखरेचा वापर केला जातो. उपवासापासून इतर दिवशी सुद्धा आपण साखरेचा उपयोग वापर करत असतो. मात्र या साखरेत नेचरल कार्बन वापरले जाते. हे कार्बन जनावरांच्या हाडापासून बनवत असल्याचे समोर आले आहे.

जॅम : लहान मुलांचाच नव्हे तर मोठयांचा देखील आवडता पदार्थ. सकाळचा नास्ता असो वा संध्याकाळचा ब्रेड सोबत जॅमचं कॉम्बिनेशन नेहमीच ऑल टाईम फेव्हरेट राहिलंय. मात्र जॅम प्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे, कदाचित हि बातमी ऐकून तुम्हाला धक्क्का बसेल. कारण फ्रुट जॅममध्ये जनावरांच्या शरीरातील जिलेटिनचा वापर केला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दही : जर तुम्ही व्हेजिटेरियन आहात, तर एक चांगला सल्ला आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्यापैकी अनेकांना बाहेरून दही आणण्याची सवय असते. ते भलेही चवीला आपल्याला आवडत असेल, मात्र यात धोका आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवा. बाहेरून विकत आणलेल्या दहिमध्ये जिलेटिनचा वापर केला गेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. जे जिलेटिन जनावरांच्या शरीरात आढळून येते. त्यामुळे तुम्ही सुद्धा दही खाण्याचे शौकिन असाल तर दही बाहेरुन विकत आणण्यापेक्षा घरीच लावलंत तर तुमच्याच फायद्याचं आहे.

तेल : तेलाशिवाय जेवण बनणे जवळजवळ अशक्यच.. जेवणातल्या प्रत्येक खाद्यपदार्थात कमी अधिक प्रमाणात तेलाचा वापर हा केलाच जातो. अनेकदा आपण तेल विकत आणतो, त्यावेळी तुम्हाला एक काम करायचे आहे. तुम्ही जे तेल विकत घेणार आहात,त्या तेलात ओमेगा 3 फॅट ऍसिड आजे का याची खात्री तुम्हाला करायची आहे. कारण हे ऍसिड माशांच्या शरीरातून काढले जाते.

बियर : बियर अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय, मित्रांची मैफिल जमली कि चर्चेत बियरचा उल्लेख नसेल असं होणं जवळपास शक्यच नाही. त्यामुळे आम्ही आज जी माहिती सांगणार आहोत ती वाचून बियर प्रेमींना धक्का बसेल. कारण बियरमध्ये इजिनग्लास नामक द्रव्याचा वापर केला जातो, हे द्रव्य माशांच्या ब्लेडरपासून तयार केले जाते.
आपल्याकडे बऱ्याचदा गणपती किंवा नवरात्रीमध्ये अनेकजण नॉनव्हेज खाणं सोडतात. मात्र त्यात सुद्धा आपण कळत- नकळतपणे असे पदार्थ खातो जे खरं तर नॉनव्हेज असतात. त्यामुळे हे पदार्थ खाताना आपण काळजी घेतली पाहिजे.
(टीप- इंटरनेटवरील माहितीच्या आधारे ही वरील माहिती देण्यात आलेली आहे)