बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला जवळ जवळ एक महिना होत आला आहे. बॉलीवूडमधील नेपोटिज्मला कंटाळून सुशांतने आ*त्म*ह*त्या केली असल्याचे सोशल मिडियावर बोलले जात आहे. त्यामुळे सुशांतच्या आ*त्म*ह*त्ये*नंतर नेपोटिज्मचा वाद चांगलाच उफाळू लागला आहे. अनेक कलाकारांनी नेपोटिज्मवर आवाज उठवायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे आणि तिचा बॉयफ्रेंड यांना चांगलेच धारेवर धरले आहे. सोशल मिडीयावर दोघेही चांगलेच ट्रोल होत आहेत. त्यामुळे त्यांनी ट्रोलिंगला कंटाळून मोठे पाऊल उचलले आहे.अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेंड एक उद्योगपती असून त्याचे नाव विकी जैन आहे. तो जास्तकरून सोशल मिडियावर अॅक्टिव नसतो पण सुशांतच्या आ*त्म*ह*त्ये*नंतर सोशल मिडियावरुन नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरले आहे त्यामुळे त्याने कमेंट बॉक्स बंद करून ठेवला आहे. कमेंट बॉक्स बंद करताना त्याने लिमिटेड कमेंट हा पर्याय निवडला आहे. त्यामुळे जे लोक त्याला फॉलो करतात फक्त तेच त्याच्या पोस्टवर कमेंट करू शकतात. ट्रोलिंगमुळे त्याने या पर्याय निवडल्याचे म्हंटले जात आहे.
तर इंस्टाग्रामवर अनेकांनी अंकितासोबत ब्रेकअप करण्याचा सल्ला विकी जैनला दिला आहे. एका युजरने चक्क तूच सुशांत आणि अंकिताच्या मध्ये आला असशील असे देखील म्हंटले आहे. तर काही लोकांनी विकीला अंकिताची काळजी घे असा देखील सल्ला दिला आहे. सुशांतच्या आकस्मिक मृत्यूने अंकिताला धक्का बसला आहे त्यामुळे तिची काळजी घे असेदेखील एकाने म्हंटले आहे.
अंकिता आणि सुशांत जवळ जवळ पाच वर्षे रिलेशनमध्ये होते. पवित्र रिश्ता या एकता कपूरच्या सिरीयल मध्ये त्यांनी एकत्र काम केले होते. या दोघांची भेटदेखील याच सिरीयलच्या सेटवर झाली होती. २०१६ मध्ये अंकिता आणि सुशांत वेगळे झाले. त्यानंतर अंकिता विकीच्या प्रेमामध्ये पडली. अनेक वेळा अंकिता विकीसोबतचे फोटो सोशल मिडियावर शेयर करताना पाहायला मिळत असते.
सुशांतने १४ जून रोजी बांद्रा येथील आपल्या राहत्या घरी ग*ळ*फा*स घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्याने वयाच्या ३४ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. सुशांत गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता त्यामुळे त्याने इतके मोठे पाऊल उचलल्याचे म्हंटले जात आहे. पण अद्यापही याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.