मुंबईच्या चाळीत जन्मलेला हा निरागस मुलगा आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार नाव ऐकून व्हाल चकित !

3 Min Read

बॉलीवुडमधील अभिनेता विक्की कौशल आज भारतातील एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाला आहे. स्क्रिनवरील त्याचा अभिनय पाहताना लोक अगदी हरवून जातात. तो निभावत असलेलं प्रत्येक पात्र तो जगतो आणि लोकांना ते पात्र आपलं आपलंस वाटू लागतं. मुळतः महाराष्ट्रातील मुंबईमध्ये याचं वास्तव्य आहे. एका सामान्य कुटुंबातील असून 1988 मध्ये मुंबईतील चाळीत त्याचा जन्म झाला. विक्कीने स्वतःच्या अभिनयाचा जोरावर बॉलीवूडमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. विक्कीचे वडील बॉलीवूडमध्ये स्टंटमैन आहेत.त्याव्यतिरिक्त चित्रपटांसाठी एक्शन डायरेक्टरचे काम देखील त्यांनी केले आहे. त्यामुळे हिंदी सिनेसृष्टी त्याचासाठी नवीन नव्हती. त्यामुळे चित्रपटांबद्दल लहानपणापासूनच माहिती त्याला होती. त्याशिवाय अभ्यास आणि क्रिकेटमध्ये विक्कीला विशेष रुची होती. विशेष म्हणजे विक्कीने इंजिनिअरिंग केले आहे. तो पेशाने एलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्यूनिकेशन इंजीनियर आहे. मुंबईमधील राजीव गांधी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून विक्कीने इंजिनीअरिंगची पदवी मिळवली आहे. परंतु ऑफीसचा कामांमध्ये त्याचं मन रमलं नाही आणि या चित्रपटांतील खडतर प्रवासाला सुरुवात केली. त्याकरिता त्याने किशोर नमित कपूर एकेडमीमधून अभिनयाचा कोर्स केला.
विक्की बहुतेकदा आपल्याला वडिलांसोबत चित्रपटांचा सेटवर जातं असे. 2010 दरम्यान अनुराग कश्यप यांचा ‘गैंग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटामध्ये असिस्टेंट म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात नीरज घयावन हे सहायक दिग्दर्शकाचा भूमिकेत होते. नीरज घयावन यांचा तेव्हा आगामी चित्रपट होता “मसान”. नीरज यांनी मसान चित्रपटासाठी विक्की कौशल ला ऑडिशन साठी बोलावले. आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे नीरज घायावन यांनी विक्की कौशलला चित्रपटामध्ये काम दिले.मसान ही विक्की कौशलचा नायक म्हणून पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटामुळे नावलौकिकाला येऊन बरेचसे लोक विक्कीला ओळखू लागले. या चित्रपटासाठी बेस्ट डेब्यू साठीचा IIFA अवॉर्ड ही मिळाला. यानंतर विक्कीने एकाहून एक जबरदस्त चित्रपट दिले. जुबान, राघव 2.0, राजी आणि मग संजू हे सुपरहिट सिनेमे विक्की कौशलचा नावे आहेत. संजू चित्रपटामध्ये तर रणबीर कपूर सारखा यशस्वी अभिनेता असतानाही विक्कीचा अभिनयाची दखल घेतली गेली. त्यानंतरचा 2019 मधील ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटामुळे तर विक्की देशभर पसरला आणि आता तर तो एक यशस्वी व उत्कृष्ट अभिनेता म्हणून सर्वांच्या परिचयाचा आहे. विक्की कौशलचा उरी चित्रपटाने तर तब्बल 100 करोडची कमाई केली.
विक्कीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर विक्की खवय्या आहे आणि त्याचबरोबर त्याला फिरायला फार आवडतं. नवाजुद्दीन सिद्दीकी हे विक्कीचे आवडते अभिनेते आहेत. विक्की चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी 3 करोड इतके मानधन घेतो. मध्यंतरी अभिनेत्री हरलीन सेठी आणि विक्की बराच काळ एकमेकांना डेट करत होते. परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे ते वेगळे झाले. आता विक्की त्याचा ‘सरदार उद्दम सिंह’ या आगामी सिनेमात दिसेल. हा आगामी चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होईल.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *