महेश भट्टचा कॉल आल्यानंतर अशी झाली होती विद्या बालनची अवस्था, म्हणाली; मी आऊट ऑफ कंट्रोल झाले होते आणि खूपच…

2 Min Read

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनने आपल्या करियरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यामधीलच एक चित्रपट म्हणजे द डर्टी पिक्चर. नसीरुद्दीन शाहसोबत विद्या बालनचा या चित्रपटामधील बोल्ड अंदाज दर्शकांना खूपच आवडला होता. पण विद्याने आपल्या करियरमध्ये अशा अनेक भूमिका केल्या ज्या दर्शकांना खास पसंद आल्या नाहीत.

विद्या बालन खूपच मोकळ्या स्वभावाची आहे आणि नेहमी ती आपल्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य घेऊन फिरत असते. पण एकदा दिग्दर्शक महेश भट्टने विद्याला खूपच वाईटरित्या रडवले होते. विद्या खूपच ढसाढसा रडू लागली होती आणि तीला सांभाळणे देखील कठीण झाले होते.

विद्या बालनने २००५ मध्ये बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. परिणीती चित्रपटामधून तिने आपल्या करियरची सुरुवात केली होती. यानंतर अभिनेत्री लगे रहो मुन्नाभाई, भूल भुलैया आणि किस्मत कनेक्शन चित्रपटांमध्ये देखील पाहायला मिळाली. विद्याने द डर्टी पिक्चर चित्रपटामध्ये उत्कृष्ठ भूमिका करून दर्शकांचे मन जिंकले होते. अशाच एका चित्रपटामुळे विद्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले होते.

फिल्मफेयरला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विद्या बालनने याचा खुलासा केला आहे. हमारी अधूरी कहानी चित्रपटाच्या अगोदर घनचक्कर, शादी के साइड इफेक्ट्स आणि बॉबी जासूस फ्लॉप झाले होते. महेश भट्टने मला संडे मॉर्निंगला कॉल केला आणि म्हंटले कि मी तुझी माफी मागतो. हमारी अधूरी कहानी चालू शकला नाही.

विद्या बालन म्हणाली कि हे ऐकल्यानंतर ती ढसाढसा रडू लागली. मी माझ्या रडण्यावर कंट्रोल करू शकत नव्हते. अभिनेत्री म्हणाली कि यानंतर माझे पती सिद्धार्थ रॉय कपूर मला चेंबूरच्या साईं बाबा मंदिरला घेऊन गेले. त्यावेळी खूप जास्त पाऊस सुरु होता आणि मी कारमध्ये बसून फक्त रडत होते. बाहेरचा पाऊस बघून असे वाटत होते कि पाऊस माझ्यासोबत स्पर्धा करत होता.

विद्या म्हणते कि तुम्हाला जर्नी एन्जॉय करायला हवी. कारण जर लग्न मोडले तर तुम्ही हे म्हणून शकत नाही कि कपलने कोणताही क्षण एकत्र एन्जॉय केला नसेल. विद्या बालन जलसा चित्रपटामध्ये शेफालीसोबत शेवटची पाहायला मिळाली होती. हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर रिलीज झाला होता. चित्रपट दर्शकांना खूपच पसंद आला होता.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *