रामायण आणि महाभारत मधील कलाकार सध्या खूपच चर्चेमध्ये असून त्यांना खूपच लोकप्रियता मिळू लागली आहे. दूरदर्शन वर श्रीकृष्णा सिरीयलचे प्रसारण देखील सुरु करण्यात आले आहे. रामायणला तर दर्शकांकडून भरभरून प्रेम मिळाले त्याचबरोबर आता श्रीकृष्णा सिरीयलला देखील तितकेच प्रेम दर्शकांकडून मिळत आहे. श्रीकृष्णा सिरीयलमध्ये मराठी अभिनेता स्वप्नील जोशीने भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. पण या सिरीयलमधील आणखीन एक कलाकार खूपच प्रसिद्ध झाला होता ज्याचे नाव विलास राज आहे.अभिनेता विलास राजने श्रीकृष्णा सिरीयलमध्ये मध्ये कंसाची भूमिका साकारली होती. तथापि विलास राज या जगामध्ये नाहीत. पण ते कंसच्या भूमिकेमुळे कायमचे अमर झाले. त्यांनी हि भूमिका इतक्या उत्कृष्ठरित्या साकारली होती कि लोक त्यांना खऱ्या आयुष्यामध्ये देखील कंस मामा म्हणून ओळखू लागले होते.
त्याचबरोबर अभिनेता विलास राज यांनी श्रीकृष्णा सिरीयलशिवाय रामायणमध्ये सुद्धा लवणासुर राक्षसाची भूमिका देखील साकारली होती. विशेष म्हणजे विलास राज एक मराठी अभिनेता होते. या सिरियल्सशिवाय विलास राज यांनी रामानंद सागर यांच्या विक्रम वेताळ या सिरीयलमध्ये देखील काम केले आहे. इतक्या सर्व भूमिका साकारल्यामुळे विलास राज इतके लोकप्रिय झाले होते कि ते जिथे कुठे जात असत तिथे त्यांना भेटण्यासाठी लोक खूप गर्दी करत असत.
लहान मुले तर विलास राज यांना लवणासुर राक्षस म्हणून ओळखू लागले होते. अभिनेता विलास राज यांनी अनेक हिंदी आणि मराठी टीव्ही शोजमध्ये देखील आपल्या उत्कृष्ठ अभिनयाची छाप सोडली आहे. विशेष म्हणजे विलास राज यांच्यामुळे मराठी अभिनेता स्वप्नील जोशी याला रामायण मध्ये कुशची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. कुशची भूमिका साकारल्यामुळे स्वप्नील जोशीला खूपच प्रसिद्धी मिळाली.