८० च्या दशकातील प्रसिद्ध सिरीयल रामायण पुन्हा एकदा आपल्याला दूरदर्शनवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपल्या ८० च्या दशकातील फील पुन्हा अनुभवण्यास मिळत आहे. दूरदर्शनवर प्रसारित होणारी हि सिरीयल सध्या सर्वांच्या आवडीची बनली आहे. टीआरपी मध्ये या सिरीयलने सर्व सिरियल्सला मागे टाकून नंबर एकचे स्थान प्राप्त केले आहे. रामायणला सध्या तेच प्रेम आणि आपुलकी मिळत आहे जसे ३४ वर्षांपूर्वी मिळत होते.

रामायण मध्ये रामाची भूमिका अरुण गोविल यांनी साकारली होती तर सिताच्या भूमिकेमध्ये दीपिका चिखलिया पाहायला मिळाली होती आणि लक्ष्मणच्या भूमिकेमध्ये सुनील लहरी दिसले होते. याव्यतिरिक्त आणखी एक भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती जी दारा सिंह यांनी साकारली होती आणि ती म्हणजे हनुमानाची भूमिका.तथापि दारा सिंह यांनी आता या जगाचा निरोप घेतला आहे. आपल्या मृत्यूपूर्वी दारा सिंह यांनी रामायण बद्दल आपली एक अंतिम इच्छा व्यक्त केली होती. याचा खुलासा नुकतेच त्यांचा मुलगा बिंदू दारा सिंह याने केला आहे. बिंदू दारा सिंहने सांगितले कि वडील दारा सिंह यांना मृत्युपूर्वी पुन्हा एकदा रामायण पहायचे होते. इतकेच नाही तर संपूर्ण कुटुंबाने त्यांची हि इच्छा पूर्ण सुद्धा केली होती.बिंदू दारा सिंह पुढे म्हणाल कि आम्ही जेव्हा रामायण बघायला सुरु करत होतो तेव्हा एकदाच अनेक एपिसोड पाहत होतो. बिंदूने सांगितले कि माझ्या वडिलांनी अभिनय करियरमध्ये तिन वेळा हनुमानाची भूमिका साकारली होती. सर्वात पहिला त्यांनी जय बजरंगबली चित्रपटामध्ये हनुमानाची भूमिका साकारली होती.त्यानंतर त्यांना रामायणमध्ये हनुमानाची भूमिका साकारायची संधी मिळाली. इतकेच नव्हे तर महाभारतमध्ये सुद्धा ते हनुमानाच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते. माझ्या वडिलांनी ज्याप्रकारे हनुमानाची भूमिका साकारली, अशी भूमिका क्वचितच एखाद्या कलाकाराने साकारली असेल.