मृत्यूनंतर इतक्या करोडची संपत्ती मागे सोडून गेले ऋषी कपूर, जाणून चकित व्हाल !

3 Min Read

ऋषी कपूर भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख चेहऱ्यापैकी एक होते. ते एका अशा कुटुंबातील आहेत, ज्यांचा इतिहास भारतामध्ये फिल्म इंडस्ट्रीशी जोडला गेलेला आहे. ऋषी कपूर अभिनेता आणि दिग्दर्शक राज कपूर यांचे दुसरे सुपुत्र होते आणि ते अभिनेता पृथ्वीराज कपूरचे नातू होते. ऋषीने आपल्या वडिलांचा चित्रपट मेरा नाम जोकरमधून सुरवात केली होती, ज्यामुळे त्यांना राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला होता.त्यानंतर ऋषी अमर अकबर अँथनी, दो दूनी चार, आणि डी-डे यासह अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळाले. त्यांनी अभिनेत्री नीतू सिंहसोबत लग्न केले ज्यांच्यासोबत ऋषी कपूर यांनी १२ चित्रपटांमध्ये काम केले आहे. या दोघांना दोन मुले आहेत रिद्धिमा आणि रणबीर, जो स्वतः एक स्टार आहे. ऋषी कपूर यांचे जीवन सफल राहिले आहे, यामुळे त्यांच्याजवळ करोडोंची संपत्ती सुद्धा आहे ज्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.ऋषी कपूर यांची २०२० मधील एकूण संपत्ती :- बॉलीवूडशी परिचित असलेल्या कोणालाही माहिती आहे कि कपूर कुटुंबाचा उद्योगामध्ये देखील सन्मान आहे. भारतीय सिनेमाला काळानुसार उत्कृष्ठ बनवण्यामध्ये त्यांच्या भागीदारीमुळे त्यांना रॉयल्टी देखील मानले जाते. ऋषी कपूर यांच्या योग्यतेनुसार जवळ जवळ १२३ चित्रपटांमध्ये त्यांचे नाव कायम आहे.आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर त्यांचे वार्षिक उत्पन्न २० करोड जे जवळ जवळ ३.७ मिलियन डॉलर आहे. त्यांच्या कमाईशिवाय ऋषी कपूर यांच्याजवळ अनेक लक्झरी कार आहेत ज्याची किंमत जवळ जवळ ९.७ मिलियन डॉलर इतकी आहे. त्यांच्या सर्व मालमत्तेचा विचार केला तर २०२० मध्ये निधनाच्या वेळी ऋषी कपूर यांची एकूण संपत्ती ४० मिलियन डॉलर इतकी होती.ऋषी कपूर यांनी कसा कमावला पैसा :- १९७३ आणि २००० दरम्यान ऋषी कपूर यांनी ९२ चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या, ज्यामध्ये ३६ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सफल राहिले. त्यांनी मेरा नाम जोकरमधून सुरवात केली होती पण प्रौढ म्हणून त्यांची पहिली मुख्य भूमिका बॉबी चित्रपटामध्ये राहिली. अनेक लोकांचे असे मानणे होते कि हा चित्रपट ऋषी कपूर यांचे करियर सुरु करण्यासाठी बनवण्यात आला होता. त्यांच्या ५१ एकट्या नायक चित्रपटांमध्ये ११ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सफल राहिले तर त्यांचे ४१ चित्रपट ज्यामध्ये एकापेक्षा अधिक स्टार्स होते यामधील २५ चित्रपट सफल राहिले.त्यांना दो दूनी चार चित्रपटामधील भूमिकेसाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा फिल्मफेयर क्रिटिक्स पुरस्कार मिळाला आणि कपूर अँड सन्स मधील त्यांच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला. २००८ मध्ये भारतीय सिनेमामधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले आणि त्यांना फिल्मफेअर लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड दिला गेला.
२००८ ते २०२० दरम्यान ऋषी कपूर जवळ जवळ २५ चित्रपटांमध्ये पाहायला मिळाले, ज्यामधील काही चित्रपट सुपर डुपर हिट झाले जसे लव आज कल, अग्निपथ आणि शुद्ध देसी रोमांस, 102 नॉट आउट आणि राजमा चावल. ऋषी कपूर यांची बरीच कमाई अनेक जाहिराती आणि ब्रँड जाहिरातीमधून सुद्धा येते. जानेवारी २०१७ मध्ये ऋषी कपूर यांनी आपले आत्मचरित्र प्रसिद्ध केले ज्याचे नाव होते खुल्लम खुल्ला: ऋषि कपूर अनसेंसर्ड.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *