आज जेव्हा बॉलीवूडचे नाव घेतले जाते तेव्हा अमिताभ बच्चन यांच्या नावाचा उल्लेख नक्कीच येतो. अमिताभ बच्चनने भारतीय सिनेमाला खूप मोठे योगदान दिले आहे. आज इतके वय होऊदेखील ते अजून बॉलीवूडमध्ये सक्रीय आहेत. तसे तर जेवढे ते चित्रपटांमध्ये सक्रीय आहेत तितकेच ते सोशल मिडियावर देखील सक्रीय आहेत. आज अमिताभ आणि मिडियामध्ये खूपच चांगले संबंध आहेत, पण एक काळ असा होता कि जेव्हा अमिताभवर मिडियाने १५ वर्षांसाठी बंदी घातली होती.

हि गोष्ट त्याकाळची आहे ज्यावेळी देशामध्ये इंदिरा गांधीच्या काळामध्ये आपत्कालीन परिस्थिती लागू करण्यात आली होती. त्यावेळी प्रत्येक प्रकारच्या मनोरंजनाच्या साधनावर बंदी होती. पण सरकारने मॅगजीनवर देखील बंदी घातली होती, ज्याचा मॅगजीनवर खूप मोठा प्रभाव पडला.त्यावेळी अशा बातम्या समोर आल्या होत्या कि मॅगजीनवर लागलेल्या बंदीचे कारण अमिताभ बच्चन होते. कारण त्यादरम्यान अमिताभबद्दल एक बातमी मॅगजीनमध्ये छापली होती, तेव्हा खूपच मोठा वाद निर्माण झाला होता आणि अमिताभने त्या मॅगजीनला बंद करण्याची धमकी दिली होती.पण जेव्हा आपत्कालीन परिस्थितीत मॅगजीनवर बंदी घातली गेली तेव्हा अशी बातमी येऊ लागली कि याच्यामध्ये अमिताभ यांचा हात आहे कारण अमिताभ गांधी परिवाराच्या खूपच जवळ होते. १९७७ मध्ये जेव्हा निवडणुकीमध्ये इंदिरा गांधीचा पराभव झाला तेव्हा स्टारडस्ट आणि सिनेब्लिट्ज़ मॅगजीनवरच्या इडीटर्सने निर्णय घेतला कि ते अमिताभ आणि त्यांच्यासंबंधित कोणताही फोटो किंवा बातमी छापणार नाहीत. याबद्दल अनेक दिवसांपर्यंत अमिताभला काहीच माहिती नव्हते, पण जेव्हा त्यांना माहित झाले तेव्हा त्यांनीसुद्धा मिडियाला बायकाट केले.अपघातामुळे सुधारले होते संबंध :- १९८२ मध्ये कुली चित्रपटाच्या वेळी अमिताभ जेव्हा जखमी झाले होते तेव्हा पूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. त्यावेळी त्या मॅगजीननेसुद्धा त्यांच्यासाठी लेख लिहिला आणि प्रार्थना केली. यानंतर १९८९ मध्ये जेव्हा अमिताभचे नाव बोफोर्स घोटाळ्यामध्ये आले तेव्हा त्यांनी चित्रपटाच्या सेटवर मिडियाला बोलावले आणि स्पष्टीकरण देताना म्हणाले कि आपत्कालीन परिस्थितीदरम्यान मॅगजीनवर लागलेल्या बंदीमध्ये त्यांचा हात नव्हता.