आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री मुमताजच्या निधनाची बातमी सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. पण त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले त्या अजून जिवंत आहेत आणि स्वस्थ आहेत. मुमताजच्या निधनाच्या अफवेने त्यांचे कुटुंबीय खूपच अस्वस्थ झाले होते. वास्तविक काही काळापूर्वी अशी बातमी समोर आली होती कि हृदयविकाराच्या झटक्याने मुमताजचे निधन झाले आहे. तसे मुमताज आता चित्रपटांपासून दूर आहे. तथापि तिच्या काळामध्ये ती बॉलीवूडमधील सर्वात जास्त फीस घेणारी अभिनेत्री होती. विशेष गोष्ट हि आहे कि मुमताजने अमिताभ बच्चन यांना मर्सिडीज कार भेट म्हणून दिली होती. जाणून घ्या मुमताजबद्दल काही खास गोष्टी

गरीब कुटुंबामधून होती मुमताज :- मुमताज खूपच गरीब कुटुंबामधून आली होती तिच्या वडिलांचे नाव सलीम अस्करी आणि आईचे नाव शादी हबीब असे होते. मुमताजचे आईवडील मुळचे इराणचे रहिवाशी होते. मुमताजच्या जन्माच्या एक वर्षानंतर तिच्या आई वडिलांमध्ये घटस्फोट झाला. गरिबीमुळे मुमताज आणि तिच्या बहिणींनी चित्रपटामध्ये काम करण्यास सुरवात केली.बालकलाकार म्हणून सुरु केले करियर :- मुमताज ने १९५८ मध्ये सोने की चिड़िया या चित्रपटामधून एक बालकलाकार म्हणून आपले करियर सुरु केले होते. ज्यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. ज्यामध्ये वल्लाह क्या बात है, स्त्री आणि सेहरा सारखे चित्रपट सामील आहेत. मुख्य अभिनेत्री म्हणून मुमताजचा पहिला चित्रपट गहरा दाग होता जो १९६३ मध्ये प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटामधून मिळाली सर्वात जास्त प्रसिद्धी :- १९६३ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट फौलाद मध्ये मुमताजने दारा सिंह सोबत काम केले होते. मुमताजला याच चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली. एका मुलाखतीमध्ये मुमताज ने सांगितले कि – दारा सिंहसोबत स्क्रीन शेयर केल्यानंतर माझ्याकडे चित्रपटांची लाईन लागली होती. मी त्यांची नेहमीच आभारी राहीन.हिंदी चित्रपटामधील सर्वात महागडी अभिनेत्री होती मुमताज :- त्या काळामध्ये दारा सिंह एका चित्रपटासाठी ४.५ लाख रुपये घेत होते. तर मुमताज एका चित्रपटासाठी २.५ लाख रुपये घेत होती. त्या काळामध्ये इतकी मोठी रक्कम घेणारी मुमताज पहिली अभिनेत्री होती. अशाप्रकारे ती हिंदी सिनेमाच्या इतिहासामधील सर्वात जास्त फीस घेणारी अभिनेत्री बनली होती.

राजेश खन्नासोबत दिले अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट :- १९६९ मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट दो रास्ते मध्ये मुमताजने राजेश खन्ना सोबत काम केले होते. यानंतर या दोघांनी एकत्र अनेक सुपरहिट चित्रपट दिले. दोघांच्या जोडीला दर्शकांनी खूप पसंती दिली होती. १९७३ मध्ये तिने अमिताभ बच्चनसोबत एका चित्रपटामध्ये काम केले होते तेव्हा अमिताभ इंडस्ट्रीमध्ये नवीन होते.मर्सिडीजने सेटवर येत होती मुमताज :- त्या काळामध्ये मुमताज मर्सिडीज कार घेऊन सेटवर यायची. त्यावेळी मुमताज अशी एकमेव अभिनेत्री होती जिच्याकडे इतकी महागडी कार होती. तर अमिताभ एक साधी गाडी घेऊन सेटवर यायचे. एक दिवस अमिताभ आपल्यासोबत सेटवर बसलेल्या लोकांना म्हणाले एक दिवस त्यांच्याकडे सुद्धा मर्सिडीज कार असेल.

मुमताजने अमिताभला भेट दिली होती मर्सिडीज :- जेव्हा मुमताजला समजले कि अमिताभला सुद्धा मर्सिडीज सारख्या गाडीची आवड आहे तेव्हा तिने अमिताभला आपली मर्सिडीज कार भेट दिली होती. शुटींग पूर्ण झाल्यानंतर मुमताज अमिताभची कार घेऊन घरी निघून गेली होती. तर त्याबदल्यात आपली मर्सिडीज कार अमिताभला दिली होती. अमिताभ या गोष्टीवर खूपच हैराण झाले होते.पर्सनल लाइफ :- मुमताजने १९७४ मध्ये बिजनेसमॅन मयूर माधवानीसोबत लग्न केले. लग्नानंतर तिने चित्रपटांमधून काढता पाय घेतला. लग्नानंतर मुमताज आपल्या पतीसोबत लंडनमध्ये जाऊन स्थाईक झाली. मुमताजच्या दोन मुली नताशा आणि तान्या आहेत. नताशाने बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेता फरदीन खानसोबत लग्न केले आहे.