आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नील आर्मस्ट्रॉन्ग हे चंद्रावर जाणारे सर्वात पहिले व्यक्ती होते. त्यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले आणि एक इतिहास घडवला. मात्र त्यांचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. हि खरंतर एक खडतर मोहीम होती.
भारतासोबत जगभरातील वैज्ञानिकांनी अनेक गोष्टी साध्य करून दाखवल्या आहेत. यशाची अनेक शिखरे त्यांनी गाठली आहेत. त्यातील एक महत्त्वाचं शिखर म्हणजे चंद्रावर माणसाने ठेवलेलं पाऊल. आजवर चंद्रावर जाण्यासाठी अनेक मोहिमा राबविण्यात आल्या. त्यातील काहींना यश आले तर काही मोहिमांना अपयशाचा सामना करावा लागला. मानवरहित चंद्रावर सहा मोहिमा आजवर राबवण्यात आल्या ह्या मोहिमांत बारा अंतराळवीरांचा समावेश होता. 1972 नंतर चंद्रावर कोणीही पाऊल ठेवलेले नाही. मात्र कधी तुम्ही हा विचार केला आहे का? की एवढी वर्ष उलटली तरीही चंद्रावर का कोणी पाऊल ठेवले नाही. यामागे नेमके कारण काय आहे. चला तर मग जाणून घेऊयात नेमकं काय झालं, ज्याच्यामुळे 1972 नंतर आजवर मानवाने चंद्रावर पाऊल ठेवलेले नाही.

सर्वात आधी गेले होते नील आर्मस्ट्रॉन्ग
नील आर्मस्ट्रॉन्ग यांनी 23 जुलै 1969 रोजी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. पहिले पाउल म्हणण्याचा उद्देश हाच की हि पहिली संधी होती जेव्हा कोणत्याही मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. यानंतर 11 डिसेंबर 1972 रोजी अमेरिकी एस्ट्रोनॉट यूजीन सरनेन आणि हॅरिसन जॅक स्मिट यांना चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात आले. मानवाने चंद्रावर शेवटचे पाऊल ठेवले त्या गोष्टीला 48 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होणे सहाजिकच आहे की त्यानंतर मानवाने चंद्रावर पाऊल का ठेवले नाही.

यामुळे चंद्रावर पुन्हा कोणताही मानव गेला नाही
अमेरिकेने शेवटचे अपोलो 17 मिशन अंतर्गत 11 डिसेंबर 1972 रोजी चॅलेंजर लँडरच्या माध्यमातून अमेरिकन अंतराळवीर एस्ट्रोनॉट यूजीन सर्णन आणि हॅरिसन जॅक स्मिट यांना चंद्राच्या ‘टॉरस-लिट्रो’नामक जागेवर उतरवले होते. मात्र त्यानंतर चंद्रावर कोणत्याही मानवाला पाठवण्यात आले नाही, कारण या प्रकारच्या मोहिमांवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागतात. तर लॉस एंजेलिस येथील कैलिफोर्निया यूनिवर्सिटीमधील खगोल अभ्यासकांनी सांगितले की मानवाला चंद्रावर पाठविण्यासाठी आजवर खूप खर्च आला आहे, मात्र त्याचा वैज्ञानिदृष्ट्या हवा तसा वापर आजवर झालेला नाही.

आता अंतराळात जाणार एक महिला
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जॉर्ज बुश यांनी चंद्रावर मानवी मिशन पाठविण्याचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्यामुळे ‘कॉन्सटेलेशन प्रोग्राम’ला बंद करण्यात आले. मात्र 2017 मध्ये जेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नासाला चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याचे आदेश दिलेत. या आदेशानुसार आता नासा महिलेला चंद्रावर पाठविण्याची तयारी करत आहे. मुन लँडिंगच्या 50वे वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने नासातर्फे ही योजना आखण्यात आली आहे. या योजनेला ‘आर्टेमिस’ हे नाव देण्यात आले आहे. ज्या मोहिमेद्वारे महिला अंतरळवीळ अंतराळात पाठविण्यात येणार आहे. आशा आहे की 2024 पर्यंत ही मोहिम पूर्ण होईल. मात्र अंतराळात जाणारी हि महिला कोण आहे? त्या महिलेचे नाव काय आहे याची माहिती अद्यापही उपलब्ध होवू शकलेली नाही.