शाहरुख खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये एका अनोळख्या व्यक्तीने सेल्फीसाठी त्याचा हात पकडलेला दिसत आहे आणि एसआरकेचा मुलगा आर्यन त्याला प्रोटेक्ट करतो. तसे शाहरुख खानसोबत पब्लिकली अशा घटना याआधी देखील घडल्या आहेत. एकदा तर त्याने ट्रेनमध्ये महिलेकडून थप्पड देखील खाल्ली होती.

शाहरुखने या घटनेचा उल्लेख २०१८ मध्ये तेव्हा केला होता जेव्हा तो त्याच्या जीरो चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करत होता. शाहरुखला विचारले गेले कि मुंबईला तो प्लेनने आला होता कि ट्रेनने ? यावर शाहरुख म्हणाला कि मी पहिल्यांदा मुंबईला ट्रेनने आलो होत. दिल्लीवरून येणारी ट्रेन मुंबईमध्ये दाखल होतातच ती लोकल होते आणि हि गोष्ट मला माहित नव्हती. यामुळे मी कोणालाही माझ्या सीटवर बसू दिले नाही. मी म्हणालो कि हि माझी सीट आहे, मी यासाठी पैसे दिले आहेत.

शाहरुख पुढे म्हणाला कि तथापि मी माझी सीट एका महिलेला दिली आणि म्हंटले कि तुम्ही या सीटवर बसू शकता. पण मी तुम्हाला तुमच्यासोबत कोणत्याही पुरुषाला बसू देणार नाही. यावर त्या महिलेने मला थप्पड मारली आणि म्हंटले कि हि तुझी सीट नाही सर्वांची आहे.

जीरो तोच चित्रपट आहे ज्यामध्ये शाहरुख़ खान एक मुख्य अभिनेता म्हणून २०१८ मध्ये मोठ्या पडद्यावर दिसला होता. तथापि आनंद एल राय दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या आपटला होता. शाहरुख त्याच्या आगामी पठाण चित्रपटामधून मोठ्या पडद्यावर परतणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होणार आहे. शाहरुख इतर अनेक चित्रपटांच्या शुटींगमध्ये देखील व्यस्त आहे. एटली कुमारच्या दिग्दर्शनाखाली असलेला जवान आणि राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी चित्रपटदेखील पाईप लाईनमध्ये आहेत.