कपिल शर्मा आज भारतातील नंबर १ चा कॉमेडियन आहे. त्याचा शो द कपिल शर्मा शो घरा घरामध्ये प्रसिद्ध आहे. हा शो पाहून लोक खूप हसतात. पूर्ण कुटुंबासोबत हा शो पाहिला जातो. हेच कारण आहे चित्रपट स्टार नेहमी आपल्या आगामी चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी कपिलच्या शोमध्ये येत असतात. या शोमध्ये प्रमोट केलेल्या चित्रपटांना चांगलीच प्रसिद्ध मिळते. चित्रपट प्रमोशनसोबतच दर्शकांना बॉलीवूड कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील जाणून घेण्यासाठी संधी मिळते.अजूनपर्यंत कपिल शर्माच्या शोमध्ये आला नाही आमिर खान :- कपिल शर्माच्या शोमध्ये जवळ जवळ सर्व बॉलीवूड कलाकार आले आहेत पण आमिर खान अजूनपर्यंत आला नाही. असे नाही कि कपिलने त्याला शोमध्ये बोलावण्याचा प्रयत्न केला नाही तर कपिलच्या टीमने अनेक वेळा आमिर खानला शोमध्ये बोलावण्याचा प्रयत्न केला पण आमिर या शोमध्ये आला नाही. पण आमिर खान एका खास कारणामुळे आजपर्यंत कपिलच्या शोचा भाग बनला नाही. जेव्हा तुम्हाला याचे कारण माहिती होईल तेव्हा तुम्ही देखील चकित व्हाल.या कारणामुळे कपिलच्या शोमध्ये येत नाही आमिर :- कपिलच्या शोमध्ये जितके कलाकार येतात त्यांचा एक खास हेतू आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करने असते. तथापि बॉलीवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानचे काम करण्याचा प्रकार वेगळा आहे. आमिर खानचे मानणे आहे कि जर चित्रपट चांगला असेल तर त्याला प्रमोशनची गरज पडत नाही. हेच कारण आहे आमिर कपिलच्या शोमध्ये अजूनपर्यंत आपल्या कोणत्याही चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आला नाही. फक्त कपिलच्याच शोमध्ये नाही तर टीव्हीच्या कोणत्याही शोमध्ये आमिरने आपला चित्रपट प्रमोट केलेला नाही.
फक्त या टीव्ही शोमध्ये दिसला :- सहसा आमिर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणत्याही टीव्ही शोचा भाग बनत नाही. पण गेल्या वर्षी जेव्हा तो करण जौहरचा टॉक शो कॉफ़ी विथ करणमध्ये आला होता तेव्हा सर्वांना हैराणी झाली होती. तेव्हा आमिरचा ठग्स ऑफ हिन्दुस्तान चित्रपट येणार होता. तेव्हा आमिर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करणच्या शोमध्ये आला होता. विशेष म्हणजे आमिरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या फ्लॉप झाला. कदाचित त्याला देखील शुटींग दरम्यान या गोष्टीचा अंदाज लागला होता कि या चित्रपटामध्ये काही दम नाही आणि याला प्रमोशनची गरज आहे. सूत्रांनुसार मानले तर आमिर करणच्या शोमध्ये आला होता तेव्हा कपिल शर्माच्या टीमने देखील त्याला आपल्या शोमध्ये बोलावण्याचा खूप प्रयत्न केला पण तेव्हा त्यांना कोणत्याही डेट्स मिळाल्या नाहीत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.