टीव्ही जगताच्या दुनियेत अनेक मोठ-मोठया फेमस अभिनेत्री आहेत. परंतु टीव्ही शो मध्ये सध्या २० वर्षा पेक्षा कमी वयाच्या अभिनेत्री खूप पॉपुलर झाल्या आहेत. स्टाइल फॅशन आणि अभिनयाच्या बाबतीत या अभिनेत्री मोठ-मोठ्या अभिनेत्रींना टक्कर देतात. तसेच फीसच्या बाबतीत सुद्धा या अभिनेत्री मोठ-मोठया अभिनेत्रींना मात देतात. आज आपण या २० वर्षापेक्षा कमी वयाच्या अभिनेत्रींच्या फीसबद्दल जाणून घेणार आहोत.

अवनीत कौर :- टीव्हीच्या अनेक शो मध्ये अवनीत बालकलाकार म्हणून पाहायला मिळाली आहे. आज ती सब टीव्हीवरील लोकप्रिय शो अलादीन – नाम तो सुना होगा मध्ये मुख्य भूमिका करत आहे. बातमी आहे कि फक्त १७ वर्षाची अवनीत एका दिवसासाठी ३० ते ३५ हजार रुपये फीस घेते.जन्नत जुबैर रहमानी :- टीव्ही जगतामधील नवोदित अभिनेत्री जन्नत जुबैर खूपच कमी वयामध्ये टीव्हीवरील एक मोठे नाव बनली आहे. तू आशिकी सिरीयलमधून जन्नत खूपच प्रसिद्ध झाली. बातमीनुसार मानले तर १६ वर्षाची जन्नत जुबैर एका दिवसासाठी ४० हजार रुपये फीस घेते.रीम शेख :- टीव्ही जगतातील प्रसिद्ध शो तुझ से है राबता मध्ये मुख्य भूमिका साकारणारी रिम शेख अनेक सिरियल्समध्ये बालकलाकार म्हणून देखील पाहायला मिळाली आहे. परंतु सध्या तुझ से है राबता मधील तिच्या अभिनयाची खूपच चर्चा होत आहे. बातमी नुसार १५ वर्षाची रीम शेख एका दिवसासाठी २५ हजार रुपये फीस घेते.अनुष्का सेन :- टीव्ही अभिनेत्री अनुष्का सेन बालवीर या शो मध्ये पाहायला मिळाली होती. तसेच टीव्ही सिरीयल झांसी की राणी मध्येसुद्धा ती मुख्य भूमिकेमध्ये होती. १६ वर्षाची अनुष्का सेन एक दिवसासाठी ४८ हजार रुपये इतकि फीस घेते. ती टीव्ही जगतातील सर्वात महागडी बालअभिनेत्री म्हणून देखील प्रसिद्ध आहे.अदिति भाटिया :- टीव्ही जगतातील सुंदर अभिनेत्री अदिति भाटियाने अनेक शो मध्ये काम केले आहे. सिरियल्स व्यतिरिक्त बॉलीवूड चित्रपट विवाह मध्ये देखील ती चाईल्ड आर्टिस्ट म्हणून दिसली होती. सध्या अदिति ये है मोहब्बतें मध्ये रुहीची भूमिका साकारत आहे. सध्या ती १९ वर्षांची आहे आणि ती एका दिवसासाठी ५० हजार रुपये फीस घेते. ती सर्वात महागडी बाल कलाकार म्हणून देखील प्रसिद्ध आहे.अशनूर कौर :- टीव्ही शो पटियाला बे‌‌ब्स मध्ये पाहायला मिळत असलेली अभिनेत्री अशनूर कौरने नुकतेच १० वी मध्ये ९३% मार्क घेतले होते. अभ्यासामध्ये हुशार असलेली अशनूर कौर आज टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. बातमी नुसार अशनूर कौर एका दिवसासाठी ३० हजार रुपये इतकी फीस घेते. अशनूर कौर सध्या १५ वर्षाची आहे.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.