झाडांवर का काढल्या जातात लाल आणि पांढऱ्या रंगाच्या पट्टया, जाणून घ्या यामागील खरे कारण !

4 Min Read

प्रवास हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपला प्रवास हा घडतच असतो. प्रवास करणे कोणाला आवडत नाही, प्रवासात मिळणारा आनंद त्यातुन मिळणारा अनुभव यांची गोष्टच काही वेगळी असते. एका अर्थाने बघायचं झालं तर प्रवास हा आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या कारणांनी घडत असला तरी तो खऱ्या अर्थाने आपल्याला घडवत असतो.

अनेक गोष्टींचा आणि निसर्गसौंदर्याचा साक्षीदार असलेला हा प्रवास आयुष्याशी असलेलं आपलं नातं अजुनच घट्ट करत असतो. जगण्याला एक नवी उमेद देण्याचं काम प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक गोष्टी आपल्या नजरेस पडत असतात, तर काही आपलं लक्ष वेधून घेत असतात. अशाच काही गोष्टी सुद्धा असतात, ज्या तिथे असण्याला काहीतरी कारण नक्कीच असतं. अनेकदा आपल्याला त्या विशिष्ट गोष्टींची माहिती नसली तरी त्याबद्दल माहिती जाणून घेणे आपल्याच फायद्याचे ठरते. चला तर मग आज अशाच एका गोष्टींबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, जी गोष्ट कुठेही प्रवास करताना तुमच्या नजरेस हमखास पडत असते.प्रवासाला गेल्यावर आपल्याला नेहमीच रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावलेली दिसतात. हिच झाडं आपला प्रवास अधिक सुखकर करण्यास मदत करत असतात. या झाडांमुळे प्रवास करून निसर्गसौंदर्याचा मनापासून आनंद घेणे आपल्याला शक्य होत असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी ही झाडे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांपेक्षा थोडीशी वेगळी आहेत.

वेगळी म्हणजेच आपल्या आसपास असणाऱ्या झाडांसारखीच हीसुद्धा झाडे, मात्र त्यांच्यावर केले गेलेल्या रंगकामामुळे इतर झाडांपेक्षा ती वेगळी दिसतात. प्रवास करत असताना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांवर विशिष्ट प्रकारच्या रंगाने रंगकाम केल्याचे तुम्ही निश्चितच पाहिले असेल. साधारणत: या झाडांच्या खोडावर सफेद आणि लाल रंगाने रंगकाम केलेले असते. मात्र या रंगकामा मागचे नेमके कारण तुम्हाला माहिती आहे का? किंवा त्यामागचे नेमके कारण जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? खरं तर या झाडांवरील रंगकामांमागे वैज्ञानिक कारण आहे कदाचित तुम्हाला माहिती नसेल.झाडांच्या खोडांवर रंग काम करण्याची ही पद्धत फार वर्षांपूर्वीची आहे. झाडांच्या खोडावर अशाप्रकारे रंग काम करण्याचा उद्देश म्हणजे झाडांच्या खोडांना आणखी मजबूत देणे हे आहे. तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल वर्षांनुवर्षे तग धरून असलेल्या या झाडाला, त्याच्या खोडाला एक प्रकारचा शुष्कपणा येतो आणि। त्यामुळे झाडाचे खोड कमजोर होते. या शुष्कपणामुळे झाडाच्या खोडाची साल गळू लागते. ज्यामुळे झाडांचा मजबूतपणा पूर्वीपेक्षा कमी होतो, त्यांचा हा कमजोरपणा घालवण्यासाठी किंवा झाडांच्या खोडामध्ये मजबूतपणा टिकवण्यासाठी झाडांवर रंगकाम केले जाते. या रंगकाममुळे झाडाची मजबूती टिकून राहते आणि त्याचे आयुर्मान देखील वाढते.

झाडांवर रंगकाम केल्यामुळे त्यांची सुरक्षितता देखील पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात वाढते. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनेक झाडांवर आपण अशाप्रकारे रंगकाम केल्याचे पाहतो. ही रंग काम केलेली झाडे एक विशिष्ट प्रकारचे संकेत आपल्याला देत असतात. हे संकेत म्हणजे ही झाडे वन विभागाच्या नजरेखाली असून ती कोणालाही तोडता येणार नाहीत असा त्याचा अर्थ होतो. काही ठिकाणी अशा प्रकारे झाडांवर रंगकाम करण्यासाठी फक्त पांढऱ्या रंगाचा वापर केला जातो. मात्र काही ठिकाणी रंगकामासाठी लाल आणि निळ्या रंगाचा सुद्धा वापर केल्याचे आपल्याला पाहायला मिळते.राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या झाडांना सुद्धा रंगकाम केल्याचे आपण अनेकदा पाहतो. बऱ्याचदा पांढऱ्या रंगाने या झाडांवर रंगकाम केलेले जाते यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. पांढऱ्या रंगाचा रंगकामासाठी वापर केल्यामुळे रात्रीच्या सुमारास वाहन चालवताना वाहनचालकांना कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणे लागू नये. झाडांवर पांढरा रंग दिल्यामुळे ती सहज दिसतात आणि वाहन चालवत असताना चालकांना अडथळा येत नाही. आजवर तुम्ही अनेकदा रंगकाम केलेली झाडे पहिली असतील, पण रंगकामामागचे हे कारण आणि त्यासंबंधीची ही इंटरेस्टिंग माहिती कशी वाटली कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *