बॉलीवुड अभिनेत्री जरीन खान आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये जरीनने सलमान खान सोबत वीर चित्रपटामधून डेब्यू केला होता. हुबेहूब कॅटरीना सारखी दिसणारी जरीना आता जशी फिट दिसते तशी ती अगोदर मुळीच दिसत नव्हती. चित्रपटामध्ये येण्याअगोदर जरीनचे वजन खूपच वाढले होते. चला तर मग आज आपण तिचे काही न पाहिलेले फोटो पाहूयात.जरीन खानचा जन्म सन १९८७ मध्ये मुंबईत येथे झाला होता. लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये जरीन खूपच क्युट दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती आपली आई आणि बहिणीसोबत पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये जरीन खान एखाद्या बाहुलीसारखी दिसत आहे.हा फोटो जरीन १२ वी मध्ये होती तेव्हाचा आहे. त्या वेळेस जरीनचे वजन तब्बल १०० किलो होते. तिने एका पोस्ट मध्ये लिहिले होते कि, मी लोकांच्या टोमण्यावर लक्ष नाही दिले. मी माझ्यासाठी माझे वजन कमी केले. जरीनने सोशल मीडिया अकाउंटवर तिचा हा जुना फोटो शेअर केला होता. हा फोटो ती जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हाचा आहे. या फोटोमध्ये जरीन आपल्या वयापेक्षा जास्त मोठी वाटत आहे. एका फोटोमध्ये जरीनने ट्रॅडिशनल ड्रेस परिधान केला आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये ती सलवार सूट मध्ये पाहायला आहे.हा फोटो शेयर करताना जरीनने लिहिले आहे की, ‘जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले तेव्हा मी खूपच वजन कमी केले होते, परंतु पहिल्या चित्रपटात तिच्या भूमिकेनुसार वजन वाढवण्यास सांगण्यात आले होते. दुर्दैवाने, माझ्या वजनाबद्दल मला टीका सहन करावी लागली. तथापि, आता जरीनने स्वत:ला खूपच फिट केले आहे. तिचे हे अलीकडील फोटो याचा पुरावा आहेत.