अनेक अभिनेत्री-अभिनेता चित्रपटसृष्टीत आले, हिट झाले, दोन-चार चित्रपट केले आणि नंतर ते कोठे गायब झाले ते कुणालाच ठाउक नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका पाकिस्तानी अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. या अभिनेत्रीला सर्वात प्रथम राज कपूरने समोर आणले होते.

होय, या अभिनेत्रीचे नाव जेबा बख्तियार हे आहे. जेबा एक पाकिस्तानी अभिनेत्री होती. जेबाचा जन्म ५ नोव्हेंबर १९६५ रोजी पाकिस्तानमध्ये झाला होता, जेबाचे खरे नाव शहीन असे होते. तीने लाहोर आणि कतार येथून आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर जेबाने आपल्या करीयरची सूरूवात पाकिस्तानमध्ये छोट्या पडद्यावरून केली होती अनारकलीमधील जेबाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.१९९१ चा सुपरहिट हिना चित्रपटामधून सुंदर अभिनेत्री जेबा बख्तियारने बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली. जेबा बख्तियारचा ‍निरागस चेहरा लोकांना खूप पसंत आला होता. पहिल्याच चित्रपटामधून ती खूप सुपरहीट झाली होती आणि ती अचाणक कुठे गायब झाली आणि सध्या ती काय करत आहे.हिना चित्रपटानंतर जेबाने काहीच चित्रपटांमध्ये काम केले पण तीचा एकही चित्रपट हिट झाला नाही. चित्रपट मिळत नसल्यामुळे चाहते जेबाला विसरू लागले. हळू हळू तिला बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले. बॉलीवुडमधील करियर संपूष्टात आल्यानंतर जेबा पुन्हा पाकिस्तानला परतली. यानंतर जेबाने सेटल होण्याचा निर्णय घेतला. मीडीया रिपोर्टनुसार जेबाने चार लग्ने केली आहेत. आता जेबा पाकिस्तानमध्ये डेली सोप डायरेक्ट करत आहे.