प्रत्येक नाते हे विश्वासावर टिकलेले असते. एकदा जर विश्वास तुटला तर नाते जपणे खूप कठीण होऊन बसते. यामुळे रिलेशनशिपमध्ये आपण पार्टनरला सर्वकाही शेयर करत असतो. पण मुली अनेक गुपिते लपवून ठेवत असतात. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मुली आपल्या पार्टनरला सांगत नाहीत. असे यामुळे नाही कि त्या घाबरतात तर यामुळे कि त्यांचे पर्सनल आयुष्य देखील त्यासोबत जोडले गेलेले असते.

अनेक मुलींचा एक भूतकाळ असतो, जो आपल्या बॉयफ्रेंडसोबत शेयर करत नाहीत. मुलीना वाटत नाही कि त्यांच्या भूतकाळाबद्दल जाणून घेतल्यानंतर त्यांच्या पार्टनरने प्रतिक्रिया द्यावी. अनेक मुली आपल्या पहिल्या प्रेमाला कधीच विसरत नाहीत. पण हि गोष्ट त्या आपल्या पतीला सांगत नाहीत कि त्यांच्या मनामध्ये त्याच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर आहे.

प्रत्येकाची एक सिक्रेट क्रश असते. पण याबद्दल मुली आपल्या बॉयफ्रेंडला कधीच सांगत नाहीत. अनेक वेळा असे होते कि मुली आपल्या मैत्रिणीला किंवा इतर मित्रांना हि गोष्ट शेयर करतात, पण पार्टनरला सांगत नाहीत.

अनेकवेळा पाहायला मिळते कि मुली आपल्या पार्टनरला आपल्या आजाराविषयी सांगत नाहीत. मुलीना वाटते कि हि गोष्ट जाणून घेतल्यानंतर त्यांचा पार्टनर काळजी करेल. यामुळे त्या एकट्याच सर्वकाही सहन करतात, पण पार्टनरला सांगत नाहीत.

असे पाहायला मिळते कि मुली आपल्या बॉयफ्रेंडसमोर आपल्या कुटुंबाच्या इमेजबद्दल खूपच जागरूक असतात. आपल्या घरच्यांसंबंधित गोष्टी त्या सिक्रेट ठेवतात. तथापि कुटुंबासंबंधी कोणतीही चांगली गोष्ट असेल तर त्या जरूर शेयर करतात.

बहुतेक मुलीना सजना संवरणे खूप आवडते. पण त्या कधीच आपल्या बॉयफ्रेंडला आपल्या मेकअप सीक्रेटबद्दल माहिती होऊ देत नाहीत. त्या आपल्या पार्टनरपासून मेकअप संबंधी गोष्टी लपवून ठेवतात. पण या गोष्ट त्या आपल्या मैत्रिणींसोबत जरूर शेयर करतात.