देशभरामध्ये भाऊबीजचा उत्सव १६ नोव्हेंबर २०२० म्हणजे सोमवारी साजरा केला जाणार आहे. भाऊबीज प्रत्येक वर्षी शुक्ल पक्षच्या द्वितीय तिथीला साजरी केली जाते. या दिवशी बहिण व्रत, पूजा आणि कथा ई. करून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भावाच्या माथ्यावर टीका लावते. या बदल्यात भाऊ तिचे रक्षण करण्याचे संकल्प करत भेटवस्तू देतो.

ज्योतिष शास्त्रानुसार भाऊबीजच्या दिवशी शुभ मुहूर्तावरच बहिणीने भावाच्या माथ्यावर टीका लावायला हवा. अशी मान्यता आहे कि भाऊबीजच्या दिवशी पूजा करण्यासोबत व्रत कथा देखील जरूर ऐकावी आणि वाचावी. असे म्हंटले जाते कि असे केल्याने शुभ फळ प्राप्ती होते.

भाऊबीज तिलक मुहूर्त :- भाऊबीजचा उत्सव कार्तिक महिन्यामध्ये शुक्ल पक्षच्या द्वितीय तिथीला साजरा केला जातो. भाऊबीजचा टीका लावण्याचा शुभ मुहूर्त १२.५६ पासून ते ०३.०६ पर्यंत आहे.

भाऊबीज कथा :- भगवान सूर्य नारायणची पत्नीचे नाव छाया होते. तिच्या उदरामधून यमराज तथा यमुनाचा जन्म झाला होता. यमुनाचे यमराजवर खूप प्रेम होते. ती त्याला नेहमी निवेध्न करत होती कि सर्व मित्रांसोबत तिच्या घरी येऊन भोजन करावे. आपल्या कार्यामध्ये व्यस्त यमराज नेहमी हि गोष्ट टाळत असे. कार्तिक शुक्लचा दिवस आला. यमुनाने त्या दिवशी पुन्हा यमराजला भोजनासाठी आमंत्रण देऊन त्याला आपल्या घरी येण्यासाठी वचनबद्ध केले.

यमराजने विचार केला कि मी तर प्राण हरण करणारा आहे. मला कोणीही आपल्या घरी बोलावत नाही. बहिण ज्या सद्भावनेने मला बोलावत आहे, त्याचे पालन करणे माझे धर्म आहे. बहिणीच्या घरी येतेवेळी यमराजने नरक निवास करणाऱ्या जीवांना मुक्त केले.

यमराजला आपल्या घरी आलेले पाहून यमुनाचा आनंद द्विगुणीत झाला. तिने स्नान करून पूजन करून भोजन करायला दिले. यमुना द्वारे केल्या गेलेल्या पाहुणचारावर खुश होऊन यमराजने प्रसन्न होऊन बहिणीला वरदान मागण्याचा आदेश दिला.

यमुनाने म्हंटले कि भद्र! तुम्ही प्रती वर्षी या दिवशी माझ्या घरी यावे. माझ्याप्रमाणे ज्या बहिणी या दिवशी आपल्या भावाचा आदर सत्कार करून टीका करतील त्यांना तुमचे भय असू नये. यमराज तथास्तु म्हणून यमुनाला अमुल्य वस्त्राभूषण देऊन यमलोकी निघून गेले.

या दिवशीपासून या पर्वाची परंपरा बनली. अशी मान्यता आहे कि जो आतिथ्य स्वीकार करतो, त्याला यमराजचे भय राहत नाही. यामुळे भाऊबीजला यमराज तथा यमुनाचे पूजन केले जाते.