आपल्या देशामध्ये लग्न असो किंवा एखादे फंक्शन, जोपर्यंत डीजेवर लोक डांस करत नाहीत तोपर्यंत मजा येत नाही. खासकरून जर एखादा परफॉर्मन्स झाला तर मग फंक्शनला आणखीनच रोनक येते. असेच एक परफॉर्मन्स सध्या इंटरनेटवर चर्चेमध्ये आला आहे. ज्यामध्ये दीर-भावजय भन्नाट डांस करताना दिसत आहेत.

तुम्ही डीजेवर नेहमी अनेकवेळा कुटुंबातील सदस्यांना तयारी करून फ्लोअरवर परफॉर्मन्स देताना पाहिलं असेल. अनेकवेळा तर लोक असाच डांस करतांत आणि लोक त्यांचे कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत. असाच एक दीर-भावजयीच्या जोडीचा डांस व्हिडीओ चर्चेमध्ये विषय बनला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि सपना चौधरीचे गाणे वाजत आहे आणि फ्लोरवर लोक डांस करत आहेत. यामध्ये एक दीर आणि तर दुसरी महिला त्याची भावजय आहे. त्यांचे मूव्ह आणि एक्सप्रेशन पाहून तुम्ही देखील या जोडीचे चाहते व्हाल.

बहु काळे नावाच्या या गाण्यावर दोघांनी देखील चांगले मूव्ह दाखवले आहेत. भावजयीने जिथे हिरव्या रंगाची साडी घातली आहे तर दिराने पांढऱ्या रंगाची जींस आणि काळ्या रंगाचा शर्ट घातला आहे आणि त्यांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवरून शेयर करण्यात आला आहे. तसा तर हा व्हिडीओ खूप जुना आहे ज्यांना आतापर्यंत १०० मिलियन व्हिव मिळाले आहेत. व्हिडीओला २० लाख पेक्षा जास्त लोकानी पसंद केले आहे तर काही लोकानी कमेंट करून ग्रेसफुल डांसचे कौतुक केले आहे.