सर्वात छोट्या बॉडी बिल्डरला मिळाली त्याची लाईफ पार्टनर, पत्नी देखील आहे ४ फुट २ इंच फोटो व्हायरल…

2 Min Read

बॉडी बिल्डर प्रतिकने आपल्या लाईफ पार्टनर जया सोबत लग्न केले आहे. जयाची उंची ४ फुट २ इंच आहे. प्रतीकचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. नुकतेच त्याने कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले.तुम्ही कोणत्याही वयामध्ये स्वतःला फिट ठेऊ शकता. इतकेच नाही तर तुमची उंची कितीही असो यामुळे काहीच फरक पडत नाही. याचे उदाहरण म्हन्ज्ते बॉडीबिल्डर प्रतीक विठ्ठल मोहिते आहे. नुकतेच तो पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे जेव्हा त्यांचे थाटामाटात लग्न केले.जगातील सर्वात छोट्या हाईटच्या बॉलीबिल्डरचा किताब प्रतिकच्या नावावर आहे. आता त्याला त्याची लाईफ पार्टनर मिळाली आहे. प्रतीची हाईट ३ फुट ४ इंच आहे आणि त्याने नुकतेच ४ फुट २ इंच मुलीसोबत लग्न केले आहे. मुलीचे नाव जया आहे आणि दोघे अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते.दोघांच्या ल्गांचे फोटो समोर आले आहेत. माहितीनुसार प्रतिक २८ वर्षाचा आहे तर त्याची पत्नी २२ वर्षाची आहे. प्रतिक जयाला चार वर्षांपूर्वी भेटला होता. यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काही दिवसांनंतर दोघांनी एंगेजमेंट केली. त्यांचे लग्न १३ मार्च रोजी झाले आहे.प्रतिकने २०२१ मध्ये सर्वात कमी प्रतिस्पर्धी बॉडी बिल्डर (पुरुष) साठी गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड मिळवला होता. तो एक इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर देखील आहे जिथे तो अनेक फिटनेस व्हिडीओ देखल टाकतो. इंस्टाग्रामवर त्याचे २ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्याला जगभरामध्ये ओळखले जाते. २०१६ मध्ये त्याने बॉडी बिल्डिंगच्या पहिल्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *