सूर्यदेव वृश्चिक राशीमधून धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि १४ जानेवारी पर्यंत या राशीमध्ये राहणार आहेत. यानंतर मकर राशीमध्ये प्रवेश करत उत्तरायण होणार आहेत. असो सूर्यदेवाच्या राशी परिवर्तनाने सर्व राशींवर याचा काहीना काही परिणाम पडणार आहे. पण काही राशी अशा आहेत ज्यांचे भाग्य उजळणार आहे.

मेष राशी :- सूर्यचे गोचर मेष राशीच्या भाग्य भावामध्ये होणार आहे, यामुळे तुम्हाला याचे अनपेक्षित परिणाम मिळणार आहेत. हा आपल्यासाठी भाग्योदयाचा काळ आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील. बिघडलेल्या कामांमध्ये सुधार होण्याची संभावना आहे. विदेश प्रवासाचे योग बनत आहेत. धर्म-कर्मामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घ्याल. ज्यामुळे समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. जर तुम्ही विदेशामध्ये राहत असाल आणि नागरिकता घेण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये सफल व्हाल.

कर्क राशी :- कर्क राशींच्या सहाव्या स्थानावर सूर्य गोचर करणार आहे, हे आपल्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मानले तर सूर्यचे गोचर तुमच्यासाठी एखाद्या वरदानाप्रमाणे आहे. यादरम्यान तुमच्या आरोग्यामध्ये सुधार येईल. व्यापाराच्या दृष्टीकोनातून हा काळ तुमच्यासाठी चांगला राहणार आहे. जर तुम्ही एखाद्या कोर्ट कचेरीमध्ये अडकला असाल तर निर्णय तुमच्या बाजूने लागण्याचे संकेत आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना देखील सफलता मिळेल. विदेशामध्ये जाण्याचे स्वप्न असेल तर ते देखील पूर्ण होऊ शकते.

सिंह राशी :- सिंह राशींच्या पंचम भावामध्ये सूर्यचे गोचर राहील. यामुळे खासकरून विद्यार्थ्यांना सफलता मिळेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत त्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. नवविवाहित जोडप्यांसाठी संतान प्राप्तीचे योग बनत आहेत. प्रेम संबंधांमध्ये उदासीनता येऊ शकते. अशामध्ये हे चांगले राहील कि तुम्ही आपल्या करियरवर लक्ष केंद्रित करावे.

तूळ राशी :- तूळ राशीच्या पराक्रम भावामध्ये सूर्यचे गोचर राहणार आहे, यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुरु असलेल्या समस्या दूर होतील. इतकेच नाही तर तुमच्या साहस आणि पराक्रमामध्ये वृद्धी होईल. कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही धैर्याने उभे राहाल आणि तुम्हाला विजय मिळेल. कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही काही चांगले निर्णय घ्याल ज्याचे कौतुक होईल. विदेश प्रवासाचे योग बनत आहेत.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.