फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेला शुक्र ग्रहामध्ये मोठे परिवर्तन होणार आहे. शुक्र ग्रह कला, धन, वैभव, ऐश्वर्य आणि काम भावनेचा कारक मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रह मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या स्थितीमध्ये शुक्र २८ मार्चपर्यंत राहणार आहे. शुक्राच्या या थितीचा कोणकोणत्या राशीवर काय परिणाम होणार आहे चला तर पाहूयात.

मेष :- शुक्राच्या या परिवर्तनामुळे या राशीच्या लोकांच्या व्यक्तित्व मध्ये परिवर्तन होईल, ज्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतील. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची अनुभूती होईल, नात्यांमध्ये प्रेम वाढेल. तुम्ही तुमच्या व्यापारामध्ये नवे जोडीदार जोडू शकता.मिथुन :- या राशीच्या लोकांसाठी येणारा काळ खूपच शुभ असणार आहे कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला तुमच्या योग्यतेनुसार बढती मिळण्याची शक्यता आहे. कलात्मक कार्यामध्ये तुम्ही रुची घ्याल, ज्यामुळे धन लाभ होण्याची संभावनासुद्धा आहे. तुमच्या परिवारामध्ये सुख शांतीचे वातावरण राहील.
तूळ :-
आपले वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले राहील. विवाहित लोकांना संतान प्राप्ती होणार आहे. कुटूंबाच्या एखाद्या सदस्याबरोबर सुरु असलेले कलह दूर होणार आहेत. भागीदारीच्या व्यवसायामध्ये लाभ होणार आहे. तुम्ही यापासून मिळालेला नफा कुठेतरी गुंतवू शकता.
धनु :- या राशीच्या काही लोकांचे प्रेमसंबंध सुरु होऊ हाकतात. परदेशात जावून शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच आई वडिलांच्याकडून मंजुरी मिळणार आहे. घरातील सदस्याच्या दीर्घकाळ आजाराची समस्या लवकरच संपणार आहे.वृश्चिक :- या राशीच्या लोकांना शत्रूपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला एखादे मोठे नुकसान पोहोचवू शकतात. या राशीच्या महिलांनी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सर्वांसोबत चांगला व्यवहार करावा, अन्यथा तुमचे काम थांबू शकते. या दरम्यान जोडीदाराच्या आरोग्याची चिंता उद्भवू शकते.
टीप :-
भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.