महान ग्रह गुरु आपली स्वराशी धनुचा प्रवास संपवून २० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी आपली नीच राशी मकरमध्ये प्रवेश करत आहे. मकर राशी शनी देवाची राशी आहे आणि शनी स्वयं सध्या या राशीमध्ये गोचर करत आहे. गुरुच्या येण्याने शनी आणि गुरुची एकत्र युती फलित ज्योतिषमध्ये अप्रत्याशित परिणाम देणारी सिद्ध होऊ शकते.

वक्री मार्गी अवस्थामध्ये गोचर करत गुरु मकर राशीमध्ये २० नोव्हेंबर २०२१ च्या रात्री ११ वाजून १७ मिनिटांपर्यंत राहतील. त्यानंतर कुंभ राशीमध्ये प्रवेश करतील. धनु आणि मीन राशीचे स्वामी गुरु कर्क राशीमध्ये उच्चराशिगत आणि मकर राशी मध्ये नीचराशिगत संज्ञक असतात. यांच्या राशी परिवर्तनचे सर्व बारा राशींवर प्रभाव पडतो. आज आपण गुरुच्या राशीपरिवर्तनाने कोणत्या राशींना शुभ परिणाम मिळणार आहेत ते पाहणार आहोत.

कर्क :- राशीमधून सप्तमभावमध्ये गुरुचे परिवर्तन तुमच्या सामाजिक पद प्रतिष्ठामध्ये अत्यधिक वृद्धी करेल. पुरस्कार प्राप्तीचे योग आहेत. कार्यक्षेत्रामध्ये देखील वर्चस्व वाढेल. कोणतेही मोठे काम आरंभ करू इच्छित असाल तर किंवा एखाद्या मोठ्या करारावर हस्ताक्षर करणार असाल तर त्यादृष्टीने हे परिवर्तन खूपच चांगले राहणार आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागांसंबंधी सर्व कार्ये पूर्ण होतील. कुटुंबामध्ये मांगलिक कार्याचे आयोजन होऊ शकते आणि विवाहासंबंधी बातमी देखील मिळू शकते.

वृश्चिक :- राशीमध्ये पराक्रमभाव मध्ये गुरुचे परिवर्तन तुम्हाला अदम्य साहसी आणि पराक्रमी बनवेल. शनीच्या सोबत यांची युती तुमच्याद्वारे घेतले गेलेले निर्णय तथा केलेल्या कार्यांना सफलत बनवण्यामध्ये सहाय्यक सिद्ध होतील. धर्म कर्मच्या बाबतीत तुम्ही हिरीरीने सहभाग घ्याल आणि दान पुण्य देखील कराल. मुलांच्या बाबतीत एखादी चांगली बातमी मिळू शकते. नवदांपत्यसाठी संतान प्राप्ती चे योग बनत आहेत. आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे आणि आपल्या उर्जा शक्तीचा पूर्ण उपयोग कार्य व्यापाराच्या प्रगतीमध्ये करावा.

मकर :- तुमच्या राशीमध्ये परिवर्तन करत गुरु आणि त्याचबरोबर राशी स्वामी शनीच्या सकारात्मक प्रभावाने तुम्हाला चांगले यश मिले. सामाजिक पद प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबामध्ये मांगलिक कार्याचे आयोजन होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. विवाहासंबंधित चांगली बातमी मिळू शकते. मुलांच्या बाबतीत सुरु असलेल्या समस्या संपुष्टात येतील. नवदांपत्यसाठी संतान प्राप्ती चे योग बनत आहेत.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.