जी व्यक्ती सकाळी उठून तुळशीला जल अर्पण करते त्याच्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची नेहमी कृपा बनून राहते आणि त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये सर्व सुखांची प्राप्ती होते, त्याचे सर्व पाप नष्ट होतात. आज आम्ही तुम्हाला तुळशीचे काही खास आणि सोपे उपाय सांगणार आहोत जे केल्यानंतर तुम्हाला धनाची प्राप्ती होईल.

हिंदू धर्म आणि शास्त्रानुसार तुळशीची ८ नावे सांगितली गेली आहेत. या नावांचा जाप जो कोणी करतो त्याला कधी कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत नाही. प्रत्येक घरामध्ये तुळशीचे झाड असतेच जर यासोबत काळ्या धतुऱ्याचे रोप जर लावले तर या दोन्ही झाडांपासून आपल्याला जास्त शुभ फळ मिळते.

तुळशीचे झाड तर आपण नेहमी लोकांच्या घरामध्ये पाहिले असेल जर यासोबत काळ्या धतुऱ्याचे रोप लावून दररोज या दोन्ही झाडांना जल किंवा कच्चे दुध अर्पण केले तर तुम्हाला ब्रह्मा विष्णु आणि महेश यांच्या पुजेसमान फळ मिळते. जर तुम्हाला धना संबंधी कोणतीही समस्या असेल किंवा कोणतीही इतर समस्या असेल तर त्याहि समस्या दूर होतील. जर काळ्या धतुऱ्याबद्दल बोलायचे झाले तर काळ्या धतुऱ्यामध्ये भगवान शिवजींचा वास असतो.प्रत्येक प्रकारच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांना विशेष महत्त्व आहे म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्ही पूजा पाठ करत असाल तेव्हा तेव्हा तुळशीच्या पानांचा भोग देवाला नक्की करावा. अशाप्रकारच्या पूजेने तुम्हाला धन धान्याची प्राप्ती होईल. अनेक प्रयत्न करून देखील व्यापारामध्ये वृद्धी होत नसेल तर हा उपाय एकदा जरूर करून पाहावा.

या उपाय करण्यासाठी आपल्याला काळ्या तुळशीची आवश्यकता पाहिजे. कोणत्याही गुरुवारी आपण हा उपाय करू शकता. गुरुवारच्या दिवशी काळ्या तुळशीची काही पाने तोडून एखाद्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या व्यापाराच्या स्थानावर ठेवावी असे केल्यास तुमच्या व्यापारामध्ये वृद्धी होईल.
हराळी एक अशी खास गोष्ट आहे जी फक्त तुळशीजवळच उगवते कारण तुळशीला पवित्र मानले जाते आणि अशामध्ये तुळशीच्या आसपासची हराळी किती प्रभावित असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. याला जर पिवळ्या वस्त्रामध्ये आपण घरामध्ये बांधून ठेवले तर यामुळे आपल्या व्यापारामध्ये उन्नती होते आणि आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या बऱ्याच काळापासून असतील त्या देखील दूर होतील. जेव्हा कधी तुम्ही तुळशीला जल अर्पण करत असाल त्यावेळी ॐ तुलसी नम या मंत्राचा जाप करावा. त्याचबरोबर तुळशीच्या झाडाला तिलक देखील लावावा.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.