आपल्या हिंदू धर्मामध्ये सकाळी-संध्याकाळी आणि विविध सणांला पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते कि घरामध्ये देवाची पूजा केल्याने घरामध्ये सकारात्मक उर्जेचा प्रवाह होतो. यामुळे ज्या देखील घरामध्ये दररोज सकाळी-संध्याकाळी पूजा केली जाते.

त्या घरामध्ये हळू हळू नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा येऊ लागते. पण जेव्हा पूजेबद्दल बोलायचे झाले तर प्राथमिक असे दिसून येते कि विशेष प्रकारची पूजा किंवा विशेष सणांला केल्या जाणाऱ्या पूजेला विशेष प्रकारची पूजा थाळी देखील सजवली जाते.

कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये थाळी सजवताना आपल्याला खूपच सावधानी बाळगणे आवश्यक आहे. आपल्याला यावर विशेष लक्ष दिले पाहिजे कि कोणतीही अशी वस्तू पूजेच्या थाळीमध्ये ठेऊ नये ज्यामुळे पूजा व्यर्थ होईल आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील.

पूजेच्या थाळीमध्ये कधीच ठेऊ नये या दोन वस्तू: कोणत्याही प्रकारची पूजा करताना सुपारी आणि कापूरचा वापर जरूर केला जातो. यामुळे पुजेची थाळी सजवताना यावर विशेष रूपाने लक्ष दिले पाहिजे कि पुजेच्या थाळीमध्ये तुटलेली/चिरलेली सुपारी ठेऊ नये आणि तुटलेला कापूर देखील ठेऊ नये कारण पूजेमध्ये अखंड सुपारीचा वापर करण्याचा नियम आहे.

पूजेमध्ये कापूरदेखील कधीच तोडून टाकू नये. जर पूजेच्या थाळीमध्ये तुटलेला/चिरलेला कापूर किंवा सुपारी असेल तर देव नाराज होऊ शकतात आणि ज्या कार्याच्या पूर्तीसाठी पूजा केली जात आहे ते कार्य देखील बिघडू शकते आणि आपल्याला त्या पूजेचे उचित फळ कधीच मिळू शकणार नाही.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.