शास्त्रामध्ये तुळशी पूजेचे विशेष महत्व आहे. तसे तर वर्षभरामध्ये तुळशीची पूजा केली जाते पण कार्तिक महिन्यामध्ये केले गेलेले तुळशी पूजन आणि तुळशीसमोर दीपदान इच्छित फळ प्रदान करणारे आणि विष्णू देवाची कृपा दृष्टी मिळवणारे असते. जर तुम्ही कार्तिक महिन्याच्या कोणत्याही दिवशी श्रीहरीला तुळशी अर्पण केले तर याचे फळ गोदानच्या फळापेक्षा कितीतरी पतीने जास्त असते.

शास्त्रानुसार मानले तर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षच्या एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे खूपच प्राचीन आहे. काही लोक एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह करतात. तर काही लोक द्वादशीच्या तिथीला तुळशी विवाह करतात. तुळशी विवाहसाठी देवउठनी चा हा दिवश शुभ मानला जातो. यावर्षी तुळशी विवाह गुरुवारच्या शुभ संयोगमध्ये २६ नोव्हेंबर रोजी केला जाणार आहे.

तुळशी विवाहाची तिथी :- २६ नोव्हेंबर २०२०, दिवस गुरुवार, द्वादशी तिथी प्रारंभ, २६ नोव्हेंबर, प्रात:काल ०५.१० वाजता, द्वादशी तिथी समाप्त, २७ नोव्हेंबर २०२०, प्रात:काल ०७.४६ वाजता.

तुळशी विवाहचा विधी :- देवउठनी एकादशी किंवा द्वादशी या दोन्ही तिथींमध्ये तुम्ही ज्या दिवशी देखील तुळशी विवाह कराल त्या दिवशी सर्वात पहिला प्रात: स्नान करून व्रत करावे आणि घरच्या अंगणामध्ये तुळशीच्या रोपाजवळ उसाचा मांडव बनवून त्याला तोरणाने सजवावे. यानंतर तुळशीच्या रोपाला लाल रंगाच्या बांगड्या चढवाव्या आणि शृंगाराच्या वस्तू अर्पित कराव्या. तुळशीच्या रोपाजवळ विष्णू देवाचे शालिग्राम स्वरूप ठेवावे आणि दुध, दही आणि हळद समर्पित करावी.

तुळशी विवाहाच्या वेळी मंगलाष्टक देखील जरूर म्हणावी आणि दोन्हींच्या समक्ष तुपाचा एक दिवा लावून तुळशी विवाहाची कथा म्हणावी. यानंतर घरामध्ये जो देखील पुरुष उपस्थित आहे त्याने शालिग्रामजीला हातामध्ये घेऊन तुळशीच्या सात फेऱ्या माराव्या आणि नंतर शालिग्रामजीला तुळशीच्या उजव्या बाजूला ठेवावे. शेवटी आरती करून आणि देवाच्या चरणाला स्पर्श करून सुख समृद्धीची कामना करत तुळशी विवाह संपन्न करावा.

तुळशी विवाह कथा :- पौराणिक कथे नुसार एकदा राक्षस कुळामध्ये खूपच सुंदर कन्याचा जन्म झाला. जिचे नाव वृंदा होते. वृंदा लहानपणापासूनच विष्णू देवाची मोठी भक्त होतील. जसे ती मोठी झाली तेव्हा तिचा विवाह जलंधर नावाच्या असुरासोबत झाला. वृंदाच्या भक्तीने जलंधरला जास्त शक्ती प्राप्त झाली आणि वृंदाच्या भक्तीमुळे तो अधिक शक्तिशाली झाला. तो फक्त मनुष्यच नाही तर देवतांवर देखील अत्याचार करू लागला.

सर्व देवी देवता या समस्येचे निधन करण्यासाठी विष्णू देवा जवळ आले. तेव्हा देवतांना या समस्येमधून बाहेर काढण्यासाठी विष्णूदेवाने जलंधरचे रूप धारण करून वृंदाचा पतिव्रता धर्म नष्ट केला. ज्यामुळे जलंधरच्या शक्ती कमी झाल्या आणि तो युद्धामध्ये मारला गेला. हे जेव्हा वृंदाला समजले तेव्हा तिने विष्णूदेवाला दगड बनण्याचा शाप दिला.

सर्व देवी देवतांनी वृंदाला आपला शाप परत घेण्याची विनंती केली. यानंतर वृंदाने आपला शाप परत घेतला. पण स्वतः अग्नीमध्ये भस्म झाली. विष्णूदेवाने वृंदाच्या राखेमध्ये एक रोप लावले ज्याला तुळशी नाव दिले आणि म्हंटले कि माझ्या पूजेसोबत तुळशीचे देखील पूजन केले जाईल. तेव्हापासून विष्णूदेवाची पूजा तुळशी पूजेशिवाय अपूर्ण आहे.