मित्रांनो भारतीय संस्कृतीत दसऱ्याला विशेष महत्त्व आहे. घटस्थापनेच्या नऊ दिवसानंतर शुक्लपक्षाच्या दशमी तिथीला दसरा येतो. मर्यादा पुरुषोत्तम भगवान समजल्या जाणाऱ्या रामाने याच दिवशी रावणाचा व*ध केला होता. तसेच देवी दुर्गाने दहा दिवसांच्या यु*द्धानंतर याच दिवशी महिषासूर नावाच्या राक्षसाचा व*ध केला होता आणि त्याच्यावर विजय प्राप्त केला होता. याच दोन कारणांमुळे विजयादशमीला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून विजयादशमी अतिशय आनंदाने भारतात साजरी केली जाते. अशाप्रकारे दोन्ही प्रकारे विजयादशमी म्हणजे शक्ती पुजेचं हे अनोखं पर्व आहे.

मित्रांनो रावण महापंडित ज्ञानी होता. भगवान शंकराचा सर्वात मोठा भक्त म्हणूनही त्याची ख्याती होती. भगवान शंकरांना प्रसन्न करून त्याने अनेक वरदान मागून घेतले होते. त्याने स्वतःच्या बळाचा वापर करत देवतांना सुद्धा पराजित केलं होतं. हीच रावणाची सर्वात मोठी चूक ठरली. आपल्या बळाचा, ज्ञानाचा वापर करणाऱ्या रावणाने स्वतःलाच देव समजण्याची मोठी चूक केली. त्याच्यात अहंकार इतका वाढला होता की तो स्वतःलाच देव असल्याचे सांगत होता. एवढंच नाही तर देवांनी बनवलेले नियम बदलून स्वतःचे नियम लागू करण्याचा त्याचा विचार होता. कदाचित रावण आणखीन काही वर्ष जगला असता तर त्याने त्याची सगळी स्वप्न निश्चित पूर्ण केली असती. ज्याची फार मोठी किंमत संपूर्ण मानव जातीला आणि देवी-देवतांना सुद्धा चुकवावी लागली असती. चला तर मग जाणून घेऊयात कोणती ती ७ स्वप्न होती जी पूर्ण झाली असती तर त्याचे भयं*कर परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागले असते.

1) रावणाचं सर्वात पहिलं स्वप्न होतं पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत जाण्याचा एक मार्ग असावा. यासाठी पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत पायऱ्या कराव्यात असा त्याचा विचार होता. किंबहुना हे त्याचे स्वप्न होते. तो असा विचार करत होता की प्रत्येकाने स्वर्गात जावे. यासाठी त्याने त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम सुद्धा सुरू केले होते. मात्र पायर्‍या बनवून तयार होतील, त्याआधी भगवान श्रीरामांनी रावणाचा व*ध केला आणि त्याचे स्वर्गापर्यंत पायऱ्या बनवण्याचे स्वप्न केवळ स्वप्नच राहिले.

2) रावणाचे दुसरे सगळ्यात मोठे स्वप्न असे होते की, जगभरात जेवढे समुद्र आहेत. त्या सगळ्या समुद्राचं पाणी गोडं करणे. हे समुद्राचं खारं पाणी विना योग्य नाही याची त्याला जाणीव होती. पृथ्वीवर पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत मुबलक आहेत. पिण्याच्या पाण्याची कधीही कमतरता पडू नये असे त्याचे प्रामाणिक मत होते. त्यामुळे समुद्राचे पाणी गोड करण्याकडे त्याचा कल होता. जगभरात उपलब्ध असलेलं समुद्राचं खारं पाणी गोडं केलं तर जगभरात पाण्याची समस्या कधीही निर्माण होणार नाही नाही हे त्यांच स्वप्न होतं.

3) रावणाचं तिसरे स्वप्न होतं ते सुद्धा अधुरे राहिले होतं, ते स्वप्न म्हणजे सोन्यामध्ये सुगंध भरण्याची त्याची तीव्र इच्छा होती. रावणाला सोन्याची प्रचंड आवड होती. कदाचित त्याच्यामुळे रावणाने सोन्याची लंका उभारली होती. त्याची खूप मनापासून इच्छा होती की, सोन्याला सुगंध असायला हवा. सोन्याला सुगंध असेल तर त्याचा शोध घेणे सहज शक्य होईल अशी त्यांची धारणा होती.

4) रावणाचं चौथे स्वप्न होतं वर्णभेद नाहीसा करणे. रावण स्वतः रंगाने सावळा होता त्यामुळे त्याचे असे विचार होते की सर्व लोक रंगाने गोरे असावेत आणि कोणीही एखाद्या व्यक्तीच्या रंगाला उद्देशून त्याची मस्करी करू नये किंवा रंगावरून त्याच्यावर टीका-टिप्पणी करू नये.

5) रावणाचे पाचवे स्वप्न असे होते की रक्ताचा रंग बदलणे. होय हे ऐकायला तुम्हाला विचित्र वाटत असेल. पण हे रावणाचं खरंच स्वप्न होतं. प्रत्येकाच्या शरीरात असणारे लाल रंगाचे रक्त सफेद करावे असं त्याचं स्वप्न होतं. या स्वप्नामागे ही त्याचा विचित्र विचार दडलेला होता. आपण केलेल्या हत्या जगासमोर येऊ नयेत यासाठी रक्ताचा रंग लाल ऐवजी सफेद असावा याकडे त्याचा कल होता.

6) मद्याला असणाऱ्या वासामुळे अनेक जण ती पिणे टाळतात किंवा बऱ्याचदा मद्यप्राशन केल्यानंतर तोंडाची दुर्गंधी येते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपण मद्यप्राशन केले आहे याची माहिती मिळते. मात्र रावणाचे एक स्वप्न यासंबंधीचे होते, तो मद्याला गंध विरहीत बनवू इच्छित होता. जेणेकरून सर्व लोक मद्यपानाचा आनंद घेऊ शकतील. आणखीन काही दिवस रावण जगला असता तर त्याने त्याचे हे सहावे स्वप्न सुद्धा नक्कीच पूर्ण केले.

7) रावणाचे सातवे आणि शेवटचे स्वप्न असे होते की या संपूर्ण संसारातून देवाची पूजा बंद केली जावी आणि संपूर्ण जगाने त्याला पुजावे. मात्र रावणाचे स्वप्न केवळ स्वप्नच राहिले. त्याचे हे स्वप्न त्याच्यासोबतच जळून खाक झाले.

तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला रावणाची ही ७ स्वप्न. जी कधीही पूर्ण झाली नाहीत. एका अर्थाने त्याची ही स्वप्न पूर्ण झाली नाहीत, हे आपल्याच फायद्याचे आहे. त्याची ही स्वप्न पूर्ण झाली असती, तर त्याची फार मोठी किंमत संपूर्ण मानव जातीला आणि देवी-देवतांना सुद्धा चुकवावी लागली असती.