केस काळे आणि दाट असणं तरुणपणाचं, तर केस पांढरे आणि विरळ असणं म्हातारपणाचं लक्षण मानलं जातं. पण अगदी सर्वानाच पांढरे आणि विरळ केस नको असतात. सर्वांना तरुण दिसायचं असत. त्या साठी प्रत्येक जण हरतऱ्हेचे उपाय करत असतो. वेगवेगळे उत्पादने ट्राय करत असतो. अशा अनेक उत्पादनांमध्ये केमिकल्स वापरलेली असतात.

अशा केमिकल्स चा उलट परिणाम आपल्या केसांवर दिसून येतो. काही आयुर्वेदिक उत्पादनापासूनही लोकांना हवा तसा रिजल्ट मिळत नाही. सर्व प्रयत्न करून झाल्यानंतर मग तुम्ही निराश होता कारण पैशांसोबतच तुमचा वेळ ही वाया गेलेला असतो. ह्याच साठी आम्ही ह्या लेख मध्ये काही उपाय घेऊन आलो आहोत जे तुम्ही घरबसल्याही करू शकता.

बदलत्या जीवनशैलीमध्ये प्रत्येक दुसऱ्या माणसाला केस गळतीचा किंवा केस पांढरे होण्याची समस्या असते. तरुण मुलं ह्या समस्यांबाबत चांगलेच जागरूक आहेत. सुंदरते ला जर पूर्ण पणे टिकवायचं असेल तर केसांची काळजी घ्यावीच लागेल. ब्युटिशियन रचना बजाज म्हणते कि तुम्हाला तुमच्या केसांची सुंदरता टिकवायची असेल तर तुमच्या मेहेंदी मध्ये काही गोष्टी तुम्ही नक्कीच मिक्स केल्या पाहिजेत. जर तुम्ही असे केले तर एका आठवड्यात तुमचे केस चमकदार आणि दाट होतील.मिक्स करा ही एक गोष्ट :- ज्या दिवशी तुम्ही मेहेंदी लावाल, त्या दिवसाच्या अगोदर तुम्हाला मेहेंदी आणि बदामाच्या तेलाची गरज पडेल. त्या अगोदर सर्वात आधी तुम्हाला एका भांड्यात मेहेंदी आणि पाणी टाकून मिक्स करायचं आहे. ह्याला मंद आचेवर गरम करून ठेवायचं आहे. काही वेळाने ह्या मध्ये बदामाचं तेल टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे.

ह्या मिश्रणाला आता थंड व्हायला ठेवायचं आहे. थंड झाल्या नंतर ह्या मिश्रणाला तुमच्या केसांवर लावायचं आहे आणि सुके पर्यंत तसंच ठेवायचं आहे. सुकल्यानंतर व्यवस्थित धुवून घ्या. हेच ४ आठवडे केल्यास तुमचे केस ही दाट, काळे, आणि मजबूत होतील. हा उपाय आपल्याला फक्त आठवड्यातून एकदाच करायचा आहे.सुंदर केसांसाठी काही टिप्स :- १) केसांना जर सुंदर बनवायचं असेल तर केसांना तिळाचे तेल तर लावाच पण ह्याच सेवन सुद्धा खूप लाभकारी आहे. जर आपण आपल्या आहारामध्ये तिळा चा वापर केल्यास तुमचे केस दीर्घ काळासाठी काळे आणि दाट होतात.
२) जेव्हा पण तुम्ही तुमचे केस धुवाल तेव्हा शिकेकाई पावडर किंवा माईल्ड शाम्पू चा वापर करा.
३) केस धुण्या अगोदर एक कप चहाचं पाणी गरम करून त्यामध्ये एक चमचा मीठ मिक्स करा. ह्या मिश्रणाला केस धुण्याच्या १ तास अगोदर लावा. केस काळे होतील.

४) आल्याला कुटून त्यामध्ये मध मिक्स करून त्याची पेस्ट बनवा आणि डोक्याला लावा. हा उपाय केल्याने आपले पांढरे केस काळे व्हायला सुरवात होतील.
हे उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि फरक दिसल्यास जवळच्या लोकांबरोबर शेयर ही करा आणि तुमच्या तरुणपणाचं रहस्य सांगायला विसरू नका. लेख आवडला असेल तर नक्की शेयर करा.