बॉलीवूड इंडस्ट्रीशी संबंधीत कलाकारांवर अनेक आरोप नेहमी होत राहतात. ज्यामध्ये कास्टिंग काउचसुद्धा एक गंभीर आरोप आहे. कास्टिंग काउचसारख्या गंभीर आरोपामध्ये बॉलीवूड आणि टीव्हीचे अनेक प्रसिद्ध कलाकार फसले आहेत. ज्यामध्ये अमन वर्माचे नाव देखील समोर आले आहे. ४६ वर्षांच्या अमन वर्माचे करियर कास्टिंग काउचमुळेच धोक्यामध्ये आले होते.
अमन वर्मावर २००५ मध्ये आरोप लागला होता ज्यामुळे तो रियालिटी शो बिग बॉसमध्ये देखील सामील झाला होता. परंतु यामुळे त्याला काहीच फायदा झाला नाही आणि त्याचा करियरचा ग्राफ पडतच गेला आणि तो इंडस्ट्रीपासून खूप दूर झाला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि अमन वर्माने आपल्या बहिणीशीच लग्न केले होते. अमन वर्माने आपल्या सख्या बहिणीशी नाही तर ऑनस्क्रीन बहिण वंदनासोबत लग्न केले होते. हे दोघे टीव्ही शो शपथमध्ये भाऊ-बहिणीची भूमिका करताना पाहायला मिळाले होते.दोघांनी १४ डिसेंबर २०१५ मध्ये एंगेजमेंट केली आणि त्यानंतर काही दिवसांतच २० एप्रिल २०१६ रोजी ते विवाह बंधनामध्ये अडकले. जेव्हा अमनच्या लग्नाचे विधी चालू होते त्यावेळी लग्नाच्या एक दिवस अगोदर त्याच्या वडिलांचे निधन झाले. अमन ने वडिलांच्या निधनानंतर लग्न थांबवले होते. परंतु त्यांच्या कुटुंबातील लोकांनी या दोघांचे लग्न अगदी थाटामाटात करून दिले. लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले होते. यानंतर दोघांनी २०१७ मध्ये शाही विवाह केला.
अमन वर्मा म्हणाला कि आम्ही वडिलांच्या निधनानंतर पुढच्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्याची आई एक वर्ष वाट पाहू शकत नव्हती. यामुळे त्यांनी १४ डिसेंबर २०१६ ला लग्न केले. अमन म्हणाला कि तो अशा कुटुंबाशी संबंधीत आहे जिथे लग्न हे जीवनातील मुख्य हिस्सा मानले जाते.
अमन म्हणाला माझ्या मते लोकांनी त्यावेळी लग्न केले पाहिजे ज्यावेळी दोघे लग्नासाठी पूर्णपणे तयार असतील आणि आमच्यासाठी लग्नाची वेळ चांगली होती आणि वंदनापण माझ्यासोबत खुश होती तेव्हा आम्ही दोघांनी लग्न केले. आम्ही लग्नाअगोदर २ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिलो होतो.