रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी सलग आठव्यांदा भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. आयआयएफल वेल्थ हुरून इंडिया रिचने ही श्रीमंत व्यक्तीची यादी प्रसिद्ध केली आहे. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही ३ लाख ८० हजार ७०० कोटी रुपये इतकी आहे. आज मुकेश अंबानी यांना कोण ओळखत नाही.

मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेतच त्याचबरोबर संपूर्ण आशियातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. आपल्याला मुकेश अंबानीची जीवनशैली आणि १ दिवसाचा खर्च कदाचित माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला अंबानीच्या च्या जीवनशैलीबद्दल आणि १ दिवसाच्या खर्चाबद्दल सांगणार आहोत. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.मुकेश अंबानी आपल्या जीवनशैली आणि लक्झरी आयुष्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. आपणास सांगू इच्छितो की, मुकेश अंबानी कुटुंबासमवेत मुंबईतील अँटिल्ला नावाच्या आलिशान घरात राहतात. मुकेश अंबानी यांचे घर संपूर्ण २७ मजली आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मुकेश अंबानी यांच्या मर्सिडीजच्या चाव्या हरवल्या गेल्या तर त्यांचे लोक हेलिकॉप्टरने चावी देण्यासाठी येतात. मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणजे एका तासाची कमाई सुमारे १.२० कोटी आहेआणि आठवड्याची कमाई जवळपास २९ कोटी आहे. त्यांच्या घरात सुमारे ४०० नोकरदार काम करत आहेत.आम्ही तुम्हाला सांगतो कि, मुकेश अंबानी यांच्या कुटुंबासाठी एका दिवसाच्या जेवणाची किंमत सुमारे ७ लाख रुपये आहे. त्यांच्या घरात मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि त्याची आई कोकिलाबेन अंबानी अशी त्यांची तीन मुलं राहतात. याशिवाय मुकेश अंबानी यांच्या आलिशान घरात स्विमिंग पूल, जिम, पर्सनल थिएटर, क्लब इत्यादींचा समावेश आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, २७ मजल्यांच्या घराच्या प्रत्येक मजल्यावर एक मुख्य कर्मचारी आहे ज्याचा १ महिन्याचा पगार २००००० रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याच्या संपूर्ण घराचा स्क्वेअर फिट ४०००० पेक्षा जास्त आहे. त्याच्या घरात १६५ पेक्षा जास्त मोटारींसाठी गॅरेज आहेत आणि ३ मोठे मोठे गॅरेज तसेच हेलिपॅड आहेत.