मासे एक परिपूर्ण आहार, आरोग्यदायी फायदे जाणून तुम्ही थक्क व्हाल !

4 Min Read

भारत हा शेतीप्रधान देश आहे. येथे मोठ्या प्रमाणावर शेती होत असल्याने अन्नधान्य, भाज्या, फळफळावळ यांची विविधता मिळते व तीही मुबलक प्रमाणात. भारताला ५६०० कि.मी. लांबीचा समुद्र किनारपट्टी लाभली आहे. भारतात १३८ नद्या व उपनद्या आहेत. अफाट समुद्र किनारपट्टी व वाहणाऱ्या नद्या यामुळे मासे हा बहुतांश भारतीय लोकांचा महत्वाचा अन्नघटक बनला आहे.

महाराष्ट्रात माशांचे खूप प्रकार पाहायला मिळतात. पापलेट, बोंबिल, वांगडा, सुरमई, हलवा, रावस, मुडदुशा, सौदाळे, मोरी, मुशी, कालवे, शिंपले, तिसया, खेकडे असे अनेक प्रकारचे मासे महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीत स्थान पटकावून आहेत. महाराष्ट्रातील बहुतंश घरात मासे प्रमुख अन्न म्हणून खाल्ले जातात. असे असले महाराष्ट्रात खूप कमी लोकांना माशांबद्दल पूर्ण माहिती आहे.

अनेक व्यक्तींना मासे खाण्याची इच्छा असते पण माशांच्या अर्धवट ज्ञानामुळे ते मासे खाणे टाळतात. सध्याची पिढी ही जिज्ञासू आहे आपण काय खावे, किती खावे याबद्दल ती बरीच जागरुक आहे. पण त्यांनाही माशांबद्दल पुरेशी माहीती नाही. मासा हा इतर अन्नघटकांपेक्षा खुप जास्त महत्वाचा आहे. दध, अंडी यांची आहारात आवश्यकता असते. तेवढीच माशांचीही असते. फरक एवढाच आहे की दूध व अंड्यासारखी माशांची जाहिरात होत नाही.माशांचे प्रामुख्याने तीन प्रकार असतात. पांढरे मासे, तेलकट मासे व कवचवाले मासे.
पांढरे मासे – पापलेट, शेतक, मुडदुशा असे पांढरी त्वचा असणारे मासे यात येतात. हे मासे पचायला हलके असून चवीला चांगले असतात. आणि कमी तेलाचे असतात. यांना स्वत:चे पाणीही कमी लागते. मुख्य म्हणजे यांना हिवंस वास नसतो.

तेलकट मासे – बांगडा, बोंबील, सुरमई, हलवा असे करड्या व काळपट रंगाचे मासे हे तेलकट असतात. हे मासे पचण्यास जड असतात. या माशांना स्वत:चे असे जास्तीचे तेल असते. जास्त तेलामुळे हे वासाने व चवीने उग्र असतात. यांना पाणीही जास्त असते. त्यामुळे हे पदार्थ करण्यापुर्वी दाब देऊन जास्तीचे पाणी काढून घ्यावे लागते.

कवचवाले मासे – सर्वात वरचा कातडीचा थर कडक, मजबूत असणारे मासे. उदा. कोळंबी, शिंपले, शेवड, तिसया, खेकडे हे मासे या प्रकारात मोडतात. या ना तेल असते ना जास्तीचे पाणी. हे मासे पचायला जड असतात. प्रत्येक माशाला लक्षपूर्वक साफ करावे लागते. नाहीतर पोट बिघडण्याची क्षमता या माशांमध्ये असते.ताजे मासे कसे ओळखावे? बाजारातून मासे आणताना कोणती काळजी घ्यावी? मासा निरखून पाहणे व तो ताजा शोधून आणणे ही एक कला आहे. मासा हा सर्वात संवेदनशील व नाजुक आहे. मासा विकत घेण्यापासून तो करेपर्यंत सततची नाजुकता बाळगणे आवश्यक ठरते. त्यामुळे ताजे मासे निवडून झाल्यावर ते कोळीणीकडून कापून व काटे काढून आणणे. मासा विकत घेताना तो कडक व ताठ असावा.

मासे पाण्याने धुवावे त्यांच्या त्वचेवर विविध रंगाच्या छटा दिसल्यास मासा ताजा असतो. ताज्या माशाचे डोळे चकचकीत व सतेज असतात. माशांना शक्यतो बात ठेवू नये. मोरी, मुशीसारखे माशांचे मांस हे समोर कापून घ्यावे. पापलेटच्या कल्ल्यातून पांढरा द्रव येत असल्यास ते ताजे समजावे. बोबिल ताजे असताना तोंडाकडे केशरी, गुलावी असतात. बोंबलात पाणी जास्त असल्याने लहान व मोठा न घेता मध्यम आकाराचे घ्यावे. तिसऱ्या, शिंपले घट्ट व बंद असलेले घ्यावेत. कारण ते ताजे असतात.

उघडलेले शिंपले शिळे असतात. त्या साफ करण्यासाठी मोठ्या पातेल्यात तासभर पाण्यात घालून ठेवाव्यात त्यामुळे त्यातील वाळू बाहेर पडते. खाडीची कोळंबी समुद्री कोळंबीपेक्षा जास्त चवदार असते. करलीला काटे खूप असतात करली घेताना ती कोळीणीकडून तिरपी कापून घ्यावी. ओमेगा-३ हे शरीरात होत नाही. तेलकट मासे हे ओमेगा३ अॅसीड शरीराला मोठ्या प्रमाणावर पुरवतात. त्यामुळे रक्तभिसरण व्यवस्थित होते. हार्ट अटॅकटी शक्यता कमी होते. हार्ट-बीट व ब्लडप्रेशर व्यवस्थित करण्यासाठी आहारात तेलकट मासे घ्यावेत. मासे हे बुध्दीवर्धक असल्याने ते आहारात विशेषत: लहान मुलांच्या आहारात ठेवावे.मासे व इतर मांसाहार यात काय फरक आहे. मासे वगळून इतर मांसाहारी पदार्थही खूप आहेत. आपल्या महाराष्ट्रात कोबंडी, बोकड, ससा, कबुतर इत्यादी मांस खाल्ले जाते. मटनातून चरबी खूप प्रमाणात असते. तर चिकनमध्ये कोलेस्ट्रोरलचे प्रमाण जास्त असते. त्यापेक्षा मासे हे कमी चरबीचे व लो कॅलरीचे असतात. मासे हे प्रत्येकाने आवर्जुन खायला हवेत. वृध्द मंडळी, स्थूल व्यक्ती, मासिकपाळी संपलेल्या गृहिणींनी, वाढत्या वयाच्या मुलांनी हे खायला हवेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *