बेसन कढी : पाहताच तोंडाला सुटेल पाणी, खाण्याचे आहे खूप सारे आरोग्यदायी फायदे जाणून दंग व्हाल !

4 Min Read

चण्याच्या डाळीचे पीठ म्हणजे हरभर्‍याच्या डाळीचे पीठ, ज्याला सध्या “बेसन पीठ” असे म्हणतात. हे बेसन पीठ आरोग्यासाठी अत्यंत मौल्यवान व लाभदायक असते. याचे निरनिराळे पदार्थ आपण आपल्या जेवणात नेहमी खात असतो. लाडू, कांदेभजी, बटाटे भजी, पिठले इत्यादी. त्याच बरोबर बेसनाचा अजून एक पदार्थ, तो म्हणजे “बेसनाची कढी”. याद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

बेसन कढी हि जीवनसत्व आणि खनिजांच्या गुणांनी परिपूर्ण आहे. हि कढी तुमच्या शारीरिक कार्य आणि शारीरिक वाढ होण्यास साहाय्य ठरते. बेसन कढीमध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर असतात. बेसन कढीला उत्तर भारतात “शुभ” खाद्यपदार्थ अशी ओळख आहे. हि ओळख पारंपरिक खाद्य पदार्थ आहे म्हणून नाही तर, बेसन कढीला असलेली खमंग सुवासिक आणि स्वादिष्ट चव याकरीता प्रसिद्ध आहे.बेसनाची कढी आपणास साधारण पूजेपासून ते लग्नात शाही भोजनात चाखायला मिळते. हल्ली घरगुती जेवणात सुद्धा विविध सण – उत्सवात बेसन कढीचा समावेश असतो. या कढीत जीवनसत्व व खनिजाचे गुणधर्म असतात. आणि शरीराला गती देण्याचे कार्य यामुळे होते. बेसन कढीमध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण भरपूर असते.
जर तुम्हाला बेसनाची कढी आवडते, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज आम्ही तुम्हाला बेसन कढी खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

१) हिमोग्लोबिन वाढण्यास मदत :- जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल, तर कढी खूप फायदेमंद ठरू शकेल. कारण बेसनाच्या कढीत प्रथिने, लोह भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढते.

२) चेहऱ्यावरील मुरूम दूर करते :- जर तुमच्या चेहऱ्यावर मुरूम असतील? तर घाबरून जाऊ नका. त्यासाठी घरघुती उपाय आहे. तो उपाय म्हणजे बेसन. बेसन पीठ कोलेजनची निर्मिती वाढवते. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. चेहऱ्यावरील सर्व मुरुम, गडद डाग आणि त्वचेच्या इतर समस्या कमी करण्यात मदत करते. बेसन कढी प्यायल्याने त्वचापण टवटवीत राहते.३) गर्भवती महिलांसाठी लाभदायक :- बेसणाची कढीचे सेवन हे गर्भवती महिलांसाठी फारच लाभदायक ठरते. बेसनाच्या कढीत फोलेट, व्हिटॅमिन बी ६ आणि लोह असते. हे बाळाच्या वाढ विकासास मदत करते. आणि आपल्या शरीराला पोषक घटक पदार्थ पुरविते. आणि गर्भपात होण्याची शक्यता सुद्धा कमी करते.

४) आतडे मजबूत करते :- बेसनाच्या कढीत चांगल्या जिवाणूंची परिपूर्णता असते. हे तुमच्या शरीरातील आतड्यांना लाभदायक ठरते. तुमचे आतडे निरोगी राहतात. पोषक तत्वाचे शोषण सुधारण्यास मदत करते. परिणामी तुमच्या शरीराची पचनसंस्था क्षमता चांगली राहते.

५) हृदय स्वस्थ ठेवते :- कढी मध्ये योग्य मात्रात मॅग्नेशिअमचे प्रमाण असते.त्यामुळे मांसपेशींना आराम मिळतो. आणि हृदय निरोगी तसेच स्वस्थ ठेवण्यास मदत करते.

६) रक्तातील साखरवर नियंत्रण :- जर तुम्ही रक्तातील साखरेच्या समस्येने त्रस्त असाल, तर बेसनाची कढी तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे. कढीमध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स चे कमी प्रमाण असते, ज्यामुळे मधुमेह पीडित रुग्णांसाठी एक प्रभावी भोजन ठरू शकेल.७) वजन कमी करण्यास मदत :- बेसनाच्या काढीत प्रामुख्याने बेसन पीठ आणि ताकाचा समावेश असतो. बेसन पिठात गहू पिठाच्या तुलनेत प्रथिने आणि कर्बोदके चांगले असतात. यात फोलेट आणि कमी ग्लाइसेमिक इंडेक्स प्रमाण देखीलअसतात. तसेच वजन कमी करण्यात मदत करते. आणि आपली रोग प्रतिकारकशक्ती निर्माण करते. त्याचबरोबर आपल्या हृदयासाठी सुद्धा चांगले असते. म्हणून पुढच्या वेळी आपण जेव्हा घरी किंवा बाहेर कढी खाल, तेव्हा खाण्यास संकोच करू नका. कारण त्यामुळे तुमचे वजन वाढणार नाही.

८) सर्दी खोकला दूर पळवते :- थंडीचे दिवस येताच सर्दी खोकला, शिंका, ताप येण्यास सुरुवात होते. या साऱ्यातुन मुक्तता मिळवण्यासाठी आपण नव- नवीन घरगुती उपाय करत असतो. पण सर्दी खोकला काही जाण्याचे नाव घेत नाही. अश्या परिस्तिथीत जर गरमा – गरम बेसनाची कढी प्यायल्यास सर्दी खोकला, शिंका, ताप लगेच दूर पळते. असेच खाद्य पदार्थांबद्दल नवीन माहिती जाणून घेण्यासाठी लेखाला लाइक, कमेंट आणि शेअर करायला विसरु नका.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *